जागतिक हिमोफिलिया दिन जगभरात साजरा; भारतात आहेत जवळपास 70 हजार पेशंट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | 17 एप्रिल रोजी जागतिक पातळीवर जागतिक हिमोफीलिया दिन साजरा केला जातो. या वर्षीही जागतिक हिमोफिलीया दिन साजरा केला गेला. ‘बदल स्वीकारणे: नवीन जगात काळजी घेणे ‘ हे या वर्षीचे ब्रीदवाक्य ठेऊन जागतिक हिमोफिलीया संगठणेने आजचा जागतिक हिमोफिलीया दिवस साजरा केला.

हिमोफीलिया हा रक्त न गोठण्या संबंधित आजार आहे. यामधे रुग्णाच्या शरीराच्या अंतर्गत रक्तस्राव होतो किव्वा जखम झाल्यानंतर रक्त थांबत नाही. यामुळे रुग्णांना अपंगत्व येते अथवा वेळेत उपचार न मिळाल्यास त्यांचे प्राणही जाऊ शकतात. हिमोफीलिया हा तीन प्रकारचा असतो. घटक 8, 9 आणि 7 या घटकांच्या कमतरतेमुळे हा आजार होतो व याचे ते तीन प्रकार पडतात. देशभरात याचे 70 हजार रुग्ण असून महाराष्ट्रात याचे 15 हजारांच्या आसपास रुग्ण आहेत.

जागतिक पातळीवर WFH म्हणजेच वर्ल्ड फेडरेशन ऑफ हेमॉफिलिया ही संगठना हीमोफिलियासाठी काम करते. तर, देशपातळीवर HFI म्हणजेच, हेमोफिलीया फेडरेशन ऑफ इंडिया ही संगठना देशातील हिमोफिलिया रुग्ण आणि शासन यांच्यामध्ये दुवा साधण्याचे काम करते. सोबतच, हीमोफिलिया रुग्णांना उपचार, शिक्षण, मानसिक आधार देण्याचे काम ही संस्था करत असते.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment