नवी दिल्ली । आज जागतिक डास दिन (World Mosquito day) आहे. डास जगात सर्वाधिक रोग पसरवतात आणि त्यांच्यामुळे सर्वाधिक मृत्यू देखील होतात. तुम्ही कधी विचार केला आहे का की, डास काही लोकांना जस का चावतात आणि काही कमी का चावतात?
डास माणसांना का चावतात आणि ते मानवांपर्यंत कसे पोहोचतात याचा तुम्ही विचार केला आहे का? डास काही विशिष्ट लोकांनाचा जास्त लक्ष्य बनवतात का? या मागील विज्ञानाबद्दलच्या काही विशेष गोष्टी जाणून घेऊयात.
डास माणसाने सोडलेल्या कार्बन डाय ऑक्साईडद्वारे प्रत्यक्षात त्यांच्यापर्यंत पोहोचतात. ते 10 ते 50 मीटरपर्यंत त्यांना ओळखू शकतात.
ते 5 ते 15 मीटर अंतरावरून माणसांना पाहू लागतात. व्हिज्युअल्सच्या माध्यमातून ते माणसांच्या जवळ पोहोचतात. 1 मीटरच्या जवळ जाऊन ते शरीराच्या उष्णतेने ठरवतात की त्यांना चावायचे की नाही.
आता प्रश्न असा उद्भवतो कि, डास काही लोकांनाच जास्त का चावतात? होय, ज्या लोकांच्या शरीरातून लॅक्टिक एसिडसारखी रसायने जास्त बाहेर पडतात त्यांना डास जास्त चावतात. वैज्ञानिक चाचण्यांनुसार, O रक्तगटाची लोकं याला अधिक बळी पडतात.
मानवी शरीराची रचना आणि एक्टिविटी देखील डासांना आकर्षित करतात. उदाहरणार्थ, लठ्ठ लोकं आणि कमी शारीरिक श्रम करणारी लोकं डासांचे अधिक बळी ठरतात.