जगातील सर्वात महागडे चलन: एका Bitcoin ची किंमत 10.36 लाख रुपये, अशाप्रकारे घ्या फायदा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । भारतात सर्वोच्च न्यायालयाने क्रिप्टो करंसी वरील (Crypto Currency) बंदी हटविली आहे. यानंतर, बिटकॉइन सारख्या क्रिप्टो करंसीचा व्यवहार संपूर्ण देशात होऊ लागला आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात बिटकॉईनची किंमत 14000 डॉलर्स (सुमारे 10.36 लाख रुपये) च्या पुढे गेली आहे. तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की, गेल्या सहा महिन्यांत या करंसीमध्ये 50 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. त्याचबरोबर, त्यांचा असा विश्वास आहे की, हा तेजीचा टप्पा पुढच्या सहा महिन्यांपर्यंत सुरूच राहील. आरबीआयने 2018 मध्ये क्रिप्टोकरंसी वर घातलेली बंदी सर्वोच्च न्यायालयाने मार्च 2020 मध्ये काढून टाकली होती.

आता आपण सहजपणे कोणतीही क्रिप्टोकरन्सी घर बसल्या खरेदी करू शकता
इंडियन बँक युनायटेड मल्टिस्टेट क्रेडिट कंपनी ऑपरेटिव्ह सोसायटीने (Indian bank United Multistate Credit Co. Operative Society) आता क्रिप्टोकरन्सी आणि क्रिप्टोकरन्सीच्या उत्पादनांसह आपली बँकिंग सेवा वाढविण्याची योजना आखली आहे. इंडियन बँक युनायटेड आपल्या ग्राहकांना ऑनलाइन क्रिप्टोकरन्सी बँकिंग सेवा प्रदान करेल.

तज्ञ काय म्हणतात ?
CNBC च्या अहवालानुसार, येत्या काही दिवसांत बिटकॉइन नवीन उंची गाठू शकेल. एकदा बिटकॉइनने 20 हजार डॉलर्सची पातळी ओलांडली आहे. पण त्यानंतर जोरदार घसरण झाली. अशा परिस्थितीत त्यात गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय?
क्रिप्टोकरन्सी एक डिजिटल करन्सी आहे, जी ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित आहे. या करन्सीमध्ये एनक्रिप्शनचे तंत्र वापरले जाते. या तंत्राद्वारे करन्सी ट्रान्सझॅक्शनचे संपूर्णपणे ऑडिट केले जाते, ज्यामुळे ते हॅक करणे फारच अवघड आहे. हेच कारण आहे की क्रिप्टोकरन्सीमध्ये फसवणूकीची शक्यता खूपच कमी आहे. क्रिप्टोकरन्सीचे ऑपरेशन हे सेन्ट्रल बँकेपेक्षा स्वतंत्र आहे, जी त्यांची सर्वात मोठी खासियत आहे.

इंडियन बँक युनायटेडने क्रिप्टो बँकिंग सर्विस प्रोव्हायडर Cashaa यांच्या संयुक्त विद्यमाने UNICAS नावाचे एक ज्‍वॉइंट वेंचर तयार केले असून हे उत्तर भारतातील बँकेच्या सर्व 34 शाखांना ऑनलाइन क्रिप्टो बँकिंग सर्विस आणि फिजिकल सर्विस प्रदान करेल. युनायटेड आणि काशा यांनी अशा वेळी क्रिप्टोकरन्सी बँकिंग सर्विस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे जेव्हा त्याविषयी भारतातील नियम व कायदे पूर्णपणे स्पष्ट नाहीत.

UNICAS इंडियन बँक युनाइटेड खातेधारकांना त्यांची बँक अकाउंट थेट क्रिप्टोकरन्सी वॉलेटमध्ये इंटिग्रेट करण्याची परवानगी देईल. याद्वारे ग्राहकांना त्यांच्या बँक खात्यातून थेट कॅश देऊन बिटकॉइन (Bitcoin- BTC), ईथर (Ether- ETH), रिप्पल (Ripple- XRP) आणि काशा (Cashaa- CAS) सारख्या क्रिप्टो करन्सी खरेदी करता येतील.

याशिवाय इंडियन बँक युनायटेडचे ​​खातेदार क्रिप्टोकरन्सीच्या बदल्यात कर्जही घेण्यास सक्षम असतील. Cashaa चे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार गौरव म्हणाले की, भारतात क्रिप्टोकरन्सीचा ट्रेंड वाढला आहे, म्हणूनच आम्ही इंडियन बँक युनायटेडसह UNICAS सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ते म्हणाले की, भारतात अनेक क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजमध्ये 200 टक्क्यांनी ते 400 टक्क्यांची वाढ झाली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment