हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जागतिक कुस्ती स्पर्धेत भारतीय कुस्तीपटू प्रिया मलिकने गोल्ड मेडल जिंकत इतिहास घडवला आहे. यापूर्वी काल मिराबाई चानूने ऑलिम्पिक वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक जिंकत इतिहास रचला होता त्यानंतर आता प्रिया मलिकने मिळवलेल्या गोल्ड मेडलमुळे आनंद व्यक्त होत आहे.
प्रियाने 75 किलोग्राम वजन गटात सुवर्णपदक पटकावलं आहे. तिने बेलारूसच्या कुस्तीपटूला 5-0 च्या फरकाने पराभूत करत हे सुवर्ण पदक मिळवलं आहे.
दरम्यान, प्रिया मलिकने याआधी २०१९ मध्ये पुण्यात खेलो इंडियात सुवर्णपदक, २०१९ मध्ये दिल्लीतील १७ व्या स्कूल गेम्समध्ये सुवर्णपदक आणि २०२० मध्ये पाटणा येथे झालेल्या राष्ट्रीय कॅडेट चँपियनशिपमध्ये सुवर्ण पदकाची कमाई केली आहे.