आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी कुस्त्यांचे मैदान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व कराड दक्षिणचे विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त कराड येथे जंगी कुस्त्यांचे मैदान आयोजित करण्यात आले आहे. पुरुष आणि महिला अशा दोन्ही गटात उद्या बुधवारी दि. 16 रोजी कुस्त्या होणार आहेत.

पुरुष गटात 51 तर महिला गटातही कुस्त्या लावल्या जाणार आहेत. पुरुष गटात प्रथम क्रमांकाच्या 51 हजार रुपयांची दोन कुस्त्या होणार आहेत. पै. ओमकार भातमारे (मोतीबाग तालीम, कोल्हापूर) विरूध्द पै. अक्षय मोहिते (शिवछत्रपती कुस्ती केंद्र, सुपने) आणि दुसरी कुस्ती पै. दिग्विजय जाधव (शिवछत्रपती कुस्ती केंद्र, सुपने) विरूध्द पै. अरुण बोंगारडे (मोतीबाग तालीम, कोल्हापूर) यांच्यात रंगणार आहे. पै. शुभम पाटील (शिवाजी आखाडा, कराड) विरूध्द पै. सिद्धू धायगुडे (शाहुपुरी तालीम, कोल्हापूर) यांच्यात दुसऱ्या क्रमांकाची 35 हजार रुपयांची तर पै. रंजीत राजमाने (सैदापूर) विरूध्द पै. दत्ता बनकर (शेडगेवाडी, शिराळा) यांच्यात 25 हजार रुपयांची तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती होणार आहे.

महिलांच्या प्रमुख लढतीत पै. अमृता चौगुले (शिवछत्रपती कुस्ती केंद्र, सुपने) विरूध्द पै. सम्राज्ञी देसाई (मरळी, पाटण) यांच्यात कुस्ती होणार आहे. पृथ्वीराज चव्हाण यांचा वाढदिवस 17 मार्च रोजी असून कुस्त्यांचे मैदान उद्या बुधवारी दि. 16 मार्च 2022 रोजी दुपारी 3 वाजता बैल बाजार मैदान, मलकापूर रोड कराड येथे आयोजन केल्याचे इंद्रजित चव्हाण, अधिकराव चव्हाण आणि राहूल चव्हाण यांनी माहिती दिली.

Leave a Comment