व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

स्वतःच्या शॉर्ट फिल्मची जाहिरात पाहून भावुक झाला ‘अंडरटेकर’ ; डेडमॅनला अश्रू अनावर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | WWE मधील ‘अंडरटेकर’ हे नाव आपल्यासाठी काही नवीन नाही. ९०च्या दशकात जन्मलेल्या आणि या काळात वाढलेल्या मुलांसाठी ‘अंडरटेकर’ हे नाव चांगल्याच परिचयाचे आहे. ‘डेडमॅन’ या नावाने प्रसिध्द असलेला WWE सुपरस्टार अंडरटेकरने अलिकडेच WWE रिंगमधून निवृत्ती घेतली असली तरी त्याच्या चाहत्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. अंडरटेकरची गेल्या ३० वर्षांची कारकिर्द दाखवणारी एक शॉट फिल्म लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या फिल्मची जाहिरात सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. स्वतःच्याच शॉर्ट फिल्मची जाहिरात पाहून अंडरटेकरही भावूक झाला आहे.

अंडरटेकरने आपल्या ३० वर्षांच्या करिअरमध्ये अनेक चकित करणाऱ्या मॅचेस जिंकल्या आहेत. अंडरटेकरची ती जबरदस्त एन्ट्री चाहत्यांच्या मनात अजूनही भरली आहे. आक्रमक शैली आणि डेडमॅन गिमिकमुळे तो WWE मधील आजवरचा सर्वाधिक लोकप्रिय रेसलर म्हणून ओळखला जातो. त्याने आपल्या करिअरमध्ये खेळलेल्या विविध मॅचेस, त्याचं बालपण, करिअरची सुरुवात कशी झाली? या सर्व गोष्टी या फिल्ममध्ये पाहायला मिळणार आहेत. या फिल्मची एक भारतीय जाहिरात सध्या चर्चेत आहे. ही जाहिरात पाहून अंडरटेकरही भावूक झाला. तुमचं प्रेम पाहून मी नेहमीच चकित होतो अशा आशयाचं ट्विट करुन त्याने भारतीय चाहत्यांचे आभार मानले आहेत. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अंडरटेकरचं खरं नाव मार्क कॅलवे आहे. २४ मार्च १९६५ ला त्याचा जन्म अमेरिकेत टेक्सासमध्ये झाला होता. अंडर टेकरने १९८४ पासून आपल्या कुस्तीच्या करिअरला सुरूवात करणाऱ्या अंडरटेकरने आता ३० वर्षांच्या प्रदीर्घ कारकीर्दीनंतर आता निवृत्त व्हायचं ठरवलंय.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’