चक्क अर्ध्या किंमतीत मिळतोय शाओमीचा 5 G मोबाईल फोन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सॅमसंग आणी एलजी यासारख्या कंपन्यांना त्यांच्या देशात टक्कर देण्याासाठी शाओमीने कंबर कसली आहे. दक्षिण कोरियात ५जी  मार्केट खूप मजबूत आहे. या मार्केटमध्ये सॅमसंग आणि एलजीचा दबदबा आहे. आहे. चायनीज ब्रँड शाओमी आपल्या ५जी स्मार्टफोन सोबत या मार्केटमध्ये एन्ट्री करण्याच्या तयारीत आहे. प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या तुलनेत शाओमीचा ५ जी स्मार्टफोन जवळपास अर्ध्या किंमतीत आहे. शाओमीसाठी दक्षिण कोरियाच्या मार्केटमध्ये स्थान मिळवणे आव्हानात्मक असणार आहे. या मार्केटमध्ये स्थान मिळवणे सोपे नाही.

शाओमीने नुकताच आपला ५ जी  स्मार्टफोन लाँच केला आहे. याची किंमत प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या तुलनेत अर्धी आहे. सध्या LG Velvet स्मार्टफोनची किंमत जवळपास ७४७ डॉलर आहे. तर शाओमीच्या Mi 10 Lite ची किंमत ३७४ डॉलर आहे. शाओमीच्या एका एक्झिक्यूटिव्हच्या माहितीनुसार, कोरियातील ग्राहकांसाठी कमी किंमत खूपच आकर्षक असणार आहे. तसेच याचा प्राईस परफॉर्मन्स रेशियो सुद्धा खूप पसंत पडेल. शाओमी आपल्या स्वस्त ५जी  स्मार्टफोनला दक्षिण कोरियात अनेक ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून विकणार आहे. हा फोन ऑफलाइन स्टोर्समध्ये उपलब्ध होणार नाही.

दक्षिण कोरियात शाओमीचा ऑफ्टर सेल्स सर्विस इन्फ्रास्ट्रक्चर कमकुवत आहे. त्यामुळे ग्राहक कंपनीच्या स्मार्टफोनपासून दूर असतात. दक्षिण कोरियात कोणत्याही चायनीज कंपनीला हे आव्हान स्वीकारावे लागेल. सध्या ५ जी  स्मार्टफोन वरून कंपनी मोठे आव्हान स्वीकारणार असल्याचे दिसत आहे. सॅमसंग, एलजी, नोकिया, शाओमी, वनप्लस, सह अनेक कंपन्या वेगवेगळ्या भागात ५ जी स्मार्टफोन लाँच करीत आहे. तसेच चायनीज प्रोडक्टला जगभरात विरोधाचा सामना करावा लागत आहे.

You might also like