पुणे : डोक्यात दगड घालून तरुणाचा खून

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी |किरकोळ वादातून तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना पुण्यातील बालेवाडी परिसरात घडली आहे. दारू पिण्याच्या वादातून झालेल्या वादाचे रूपांतर अशा विकृत स्थितीत झाल्याचे पोलीस तपासातून पुढे आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटना स्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला आहे. चतुर्श्रुंगी पोलीस ठाण्याच्या मार्फत पुढील तपास केला जात आहे.

मारुती रामदास ढवळे (२३ )असे मयत तरुणाचे नाव असून तो मूळचा बुलढाणा जिल्ह्यातील आहे. चतुर्श्रुंगी पोलीस ठाण्यात या घटनेचा गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. बालेवाडीतील मिड कॅम्प स्कुल या ठिकाणी हि घटना घडली आहे.

सफायर पार्क परिसरातील लेबर कॅम्प मध्ये राहणारा मारुती ढवळे दारू पिण्यासाठी काल रात्री गेला असता तेथे त्याची काही व्यक्तींसोबत भांडणे झाली. त्या भांडणाचा राग डोक्यात धरूनच त्याचा काटा काढला असल्याचा पोलीसांनीप्राथमिक अंदाज लावला आहे.

Leave a Comment