‘काँग्रेसचे दोन टप्पे पडतील’ म्हणणाऱ्या आशिष शेलारांना यशोमती ठाकूरांचे प्रत्युत्तर; म्हणाल्या….

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमरावती : हॅलो महाराष्ट्र – सध्या राज्यातील राजकारण मोठ्या प्रमाणात तापले आहे. सरकारकडून आणि विरोधकांकडून आरोप – प्रत्यारोप करण्यात येत आहेत. त्यातच शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यात मध्यावधी निवडणूक लागण्याचा अंदाज वर्तवला आहे. यावरून राजकीय वर्तुळात चर्चाना मोठ्या प्रमाणात उधाण आले आहे. यानंतर आता काँग्रेसच्या नेत्या, माजी मंत्री यशोमती ठाकूर (yashomati thakur) यांनी सर्वोच्च न्यायालयाने तत्परतेने निर्णय दिला तर, मध्यावधी निवडणुका कधीही लागतील, असा अंदाज वर्तवला आहे.

काय म्हणाल्या यशोमती ठाकूर?
यशोमती ठाकूर (yashomati thakur) म्हणाल्या, “राज्यात ज्या प्रकारे स्थापन झालं, ते असंवैधानिक आहे. सर्वोच्च न्यायालय न्याय देईल, ही अपेक्षा आहे. पण, न्याय मिळण्यासाठी उशीर होत आहे. सर्वोच्च न्यायालयाने तत्परतेने निर्णय दिला तर, मध्यावधी निवडणुका लागतील. उद्धव ठाकरे बोलले ते योग्यच आहे.” असे त्या यावेळी म्हणाल्या.

आशिष शेलारांना प्रत्युत्तर
‘भारत जोडो यात्रे’त पहिल्या टप्प्यात दिसणारे काँग्रेसचे नेते दुसऱ्या टप्प्यात दिसणार नाहीत, असे भाजपा नेते आशिष शेलार म्हणाले होते. त्यावर आता यशोमती ठाकूर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “आरएसएस आणि भाजपा या दोन्ही संस्था अफवा पसरवण्याचे काम करतात. आम्ही सगळ्यांना सन्मानजनक वागणूक देतो, त्यांच्याकडून मिळण्याची अपेक्षा आहे. ‘भारत जोडो यात्रा’ एक पक्षाची नाही आहे. संविधानाचा सन्मान झाला पाहिजे, महागाईच्या विरोधातील ‘भारत जोडो’ हे आंदोलन आहे,” असं यशोमती ठाकूर (yashomati thakur)म्हणाल्या आहेत.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!