Sunday, April 2, 2023

मंत्री यशोमती ठाकूर यांचे रुग्णालयातून फायलींचा ढीग उपसून काम सुरूच

- Advertisement -

अमरावती प्रतिनिधी । सलमान खान

राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनानंतर अनेक आमदार, खासदार, मंत्री यांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री तथा अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. मात्र, असे असतानाही त्यांच्यातील काम करण्याची जिद्द आणि इच्छा तसूभरही कमी झालेली नाही. रुग्णशय्येवर असतानाही त्यांनी फायलींचा ढीग उपसून काम सुरूच ठेवल्याची माहिती एका चित्रफितीद्वारे समोर आली आहे.

- Advertisement -

राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनानंतर अनेक आमदार, खासदार, मंत्री यांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून येत आहे. राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री तथा अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनाही या दरम्यान कोरोनाची लागण झाली. त्यानंतर त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्या लोकांना चाचणी करण्याचे आवाहन करत स्वतः रुग्णालयात दाखल झाल्या.

शासकीय रुग्णसेवेवर विश्वास दाखवत त्यांनी सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल होणे पसंत केले. शासकीय कर्मचारी, रुग्णालय यंत्रणा आणि शासकीय उपचार हे दर्जेदारच असतात. त्यांचा लाभ घेण्यात कुठेही कमीपणा अथवा संकोच न करता विश्वास ठेवल्य़ास नक्कीच फायदा होतो. हे सांगत सर्वांनी शासकीय रुग्णसेवेवर विश्वास ठेवावा असे आवाहनही त्यांनी ट्विटच्या माध्यमातून केले होते.

सध्या त्यांच्यावर सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सुधारत आहे. मात्र, त्यांनी रुग्णालयातही आपल्या दैनंदिन कामकाज सुरू ठेवल्याचे दिसते आहे. रुग्णालयातील बेडवर बसूनच त्या फायलींचा ढिगारा उपसत असल्याचे एका चित्रफितीद्वारे समोर आले आहे. जनतेप्रती आणि कामाबद्दल असलेल्या त्यांच्या या निष्‍ठेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.