यशवंतराव चव्हाण यांचे पुतणे अशोकराव चव्हाण यांचे मुंबईत निधन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे पुतणे अशोकराव गणपतराव चव्हाण (वय 83) यांचे मुंबईत निधन झाले. माजी आमदार ज्येष्ठ स्वातंत्र सैनिक स्वर्गीय बाबुराव कोतवाल यांचे ते मामेभाऊ होते. श्री. चव्हाण व्यवसायानिमित्त मुंबईतस्थित होते. शहरातील सामाजिक कार्यातही ते सहभागी असायचे. चार दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईच्या कोविड रूग्ण्लायात उपचार सुरू होते. आज सकाळी त्यांचे निधन झाले. मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये ते कार्यरत होते.

अशोकराव चव्हाण यांनी कराड उत्तरमधून 2009 सालची विधानसभा निवडणूक मनसेमधून लढविली होती. त्यावेळी कराड उत्तर मतदार संघातून राष्ट्रवादी पक्षातून अतुल भोसले रिंगणात होते. तर अपक्ष असणारे बाळासाहेब पाटील यांनी विजय मिळविला होता.

अशोकराव चव्हाण यांच्या निधनाची बातमी समजताच राष्ट्रवादी पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी चव्हाण कुटुंबियांवर कोसळलेल्या दुः खात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. असे ट्विट करत भावपूर्ण श्रध्दाजंली वाहिली आहे.

Leave a Comment