व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

यवतमाळ हादरलं ! एकतर्फी प्रेमातून तरुणीची निर्घृणपणे हत्या

यवतमाळ : हॅलो महाराष्ट्र – यवतमाळमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एकतर्फी प्रेमातून एका तरुणीची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. या तरुणीची हत्या केल्यानंतर आरोपीने स्वत:वर देखील धारदार शस्त्राने वार करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याला उपचारांसाठी रुग्नालयात दाखल करण्यात आले आहे.

दगडाने ठेचून निर्घृणपणे हत्या
आरोपी तरुणाचे मृत तरुणीवर एकतर्फी प्रेम होते. आरोपी तरुणाचे नाव शुभम असे आहे. आरोपी शुभमने घटनेच्या दिवशी मृत तरुणीला एमआयडीसी परिसरात भेटण्यासाठी बोलावले. यानंतर आरोपीने त्या तरुणीची दगडाने ठेचून हत्या केली. या हल्ल्यामध्ये तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे. आरोपी शुभम याचे मृत तरुणीवर जीवापाड प्रेम होते. हा तरुण तिच्यावर जीवापाड प्रेम करत होता. मात्र त्याचे एकतर्फी प्रेम होते.

या तरुणीचे दुसऱ्या मुलासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय आरोपी शुभमला होता. यानंतर शुभमने त्या तरुणीला एमआयडीसी परिसरात भेटायला बोलावले आणि मग तिच्यावर हल्ला केला. या तरुणीची हत्या केल्यावर आरोपी शुभम याने देखील स्वत:वर वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. तो रक्ताच्या थारोळ्यात पडला असताना त्या परिसरातील नागरिकांनी एक तरुण आणि तरुणी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पहिले तातडीने याची माहिती पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा त्या तरुणीचा मृत्यू झाला होता तर आरोपी तरुण मोठ्या प्रमाणात जखमी झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.