यवतमाळ । दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनामागे पाकिस्तान-चीनचा हात असल्याचे बेताल वक्तव्य करणारे भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची जीभ कापणाऱ्या व्यक्तीला १० लाख रुपयांचे रोख बक्षीस देऊ, अशी घोषणा यवतमाळातील शिवसेनेच्या संपर्क प्रमुख संतोष ढवळे यांनी केली. पेट्रोल-डिझेल दरवाढ आणि दानवेंच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी शनिवारी येथील दत्त चौकात शिवसैनिक एकत्र आले. यावेळी प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. ‘लोकमत’ वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे.
या आंदोलनाबाबत यवतमाळ विधानसभा संपर्क प्रमुख संतोष ढवळे यांनी ‘लोकमत’ वृत्तपत्राला सांगितले की, ”आंदोलनाच्या दहा मिनिटपूर्वी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून आलेला एक इसम भेटला. आपल्याला रक्ताची गरज आहे, रक्त मिळत नाही, भाजपावाल्यांकडे गेलो तर ते शिव्या देतात, तुम्ही लोक आंदोलन करत नाही, मस्त गाड्यांमध्ये फिरता, अशा शब्दात त्यांनी सुनावले. त्यांच्या वक्तव्याने आपण क्षणात एक निर्णय घेतला. आपल्याला शेतकऱ्यांच्या मुलांनी लोकवर्गणी करून चारचाकी वाहन पक्ष कार्यासाठी व समाजसेवेसाठी उपलब्ध करून दिले आहे.
त्यामुळं शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या रावसाहेब दानवे यांची जीभ जो कोणी कापेल, त्याला आपण लगेच हे १२ लाखांचे वाहन भेट देऊ,” त्या क्षणापासून आपण पायी फिरू, वाहन वापरणार नाही, एवढेच नव्हे तर त्याला आणखी १० लाख रुपयांचे रोख बक्षीस दिले जाईल. शिवाय, त्याची रक्ततुलाही केली जाईल, अशी घोषणा आपण लगेच शिवसेनेच्या दत्त चौकातील आंदोलनात केल्याचे संतोष ढवळे यांनी सांगितले. या घोषणेचे उपस्थितांनी जोरदार स्वागत केले. दानवेंची जीभ कापण्यासाठी आपण केवळ कुणावर अवलंबून राहणार नसून स्वत:ही योग्य संधीची प्रतीक्षा करू आणि हे काम फत्ते करू, असेही ढवळे यांनी स्पष्ट केले. या आंदोलनात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पराग पिंगळे, राजेंद्र गायकवाड यांच्यासह विविध पदाधिकारी सहभागी झाले होते.
सरपंचाची निवड सदस्यातूनच होणार; आधी निवडणुका मग आरक्षण सोडत- हसन मुश्रीफ
सविस्तर वाचा-👉 https://t.co/JwfGxPERKS@mrhasanmushrif @NCPspeaks @CMOMaharashtra #ग्रामपंचायतनिवडणूक #HelloMaharashtra #castreservation— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) December 12, 2020
हातात टाळ घेत पंकजाताई भजनात तल्लीन; व्हिडिओ व्हायरल
पहा व्हिडिओ-👉 https://t.co/8LrWb2aQfy#HelloMaharashtra @Pankajamunde @BJP4Maharashtra #HelloMaharashtra— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) December 12, 2020
आणखीन एका बॉलीवूड अभिनेत्रीची राहत्या फ्लॅटमध्ये आत्महत्या; २०२० बॉलीवूडसाठी दुःस्वप्न
सविस्तर वाचा-👉 https://t.co/kjB5969n6x#HelloMaharashtra #Bollywood #sucide #dirtypictures @vidya_balan— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) December 12, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’