Yes Bank ने लॉन्च केले वेलनेस क्रेडिट कार्ड ! हेल्थ चेकअप, डॉक्टर कंसल्टेशनसह उपलब्ध असतील अनेक सुविधा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । खासगी सेक्टर येस बँक (YES BANK) ने आपल्या ग्राहकांसाठी नवीन येस बँक वेलनेस (Yes Bank Wellness) आणि येस बँक वेलनेस प्लस (Yes Bank Wellness Plus) क्रेडिट कार्ड सुरू केले आहेत. यासाठी बँकेने आदित्य बिर्ला वेलनेस प्रायव्हेट लिमिटेडशी करार केला आहे. या कार्डचे लक्ष्य हे ग्राहकांना चांगले आरोग्य आणि त्यांची काळजी हे असल्याचे बँकेने आपल्या निवेदनात म्हटले आहे.या वेलनेस कार्डच्या सहाय्याने येस बँक ग्राहक हेल्थ चेकअप, डॉक्टर कंसल्टेशनसहित अनेक फायदे घेऊ शकतात.

हे कार्ड ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन तयार केले गेले आहे. ग्राहक आदित्य बिर्ला मल्टिपल अ‍ॅपवर रजिस्ट्रेशन करू शकतात आणि हेल्थ चेकअप, राउंड द क्लॉक डॉक्टर किंवा काउंसेलर हेल्पलाइन, होम बेस्ड वर्कआउट सेशन, पर्सनलाइज्ड डाएट प्लॅनचा लाभ घेऊ शकतात.

अनेक लोकांना याचा फायदा मिळेल
बँकेने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, ग्राहकांना नवीन वास्तवाचा सामना करावा लागत आहे ज्यामध्ये विद्यार्थी घरातूनच शाळा शिकत आहेत, लोकं र्क फ्रॉम होम करत आहेत आणि इतर लोकांशी शारीरिक संपर्क टाळत आहेत. निवेदनानुसार, लोकांची काळजी घेणे, मानसिक आणि शारीरिक कल्याण वाढविण्यासाठी ही एक नाविन्यपूर्ण पायरी आहे.

Yes Bank Wellness Card द्वारे ‘हे’ फायदे मिळतील

> या बँक कार्डची किंमत 1,999 रुपये प्लस टॅक्स अशी आहे. ज्यामध्ये रिवॉर्ड पॉईंट्स वेगवेगळ्या खर्चावर उपलब्ध असतील.

> यामध्ये तुम्हाला फार्मसीशी संबंधित प्रत्येक 200 रुपयांसाठी 20 रिवॉर्ड पॉईंट्स मिळतील.

> इतर खर्चामध्ये प्रत्येक 200 रुपयांसाठी 4 रिवॉर्ड पॉईंट्स असतील.

> वार्षिक प्रिवेंटिव हेल्थ चेकअप, आय अँड डेंटल चेकअप होईल, जे 25 पॅरामीटर्सवर असेल.

> दरमहा 6 फिटनेस सेशन असतील ज्यांच्या पर्यायांमध्ये जिम, योगा आणि झुम्बा यांचा समावेश आहे.

> याद्वारे तुम्हाला अनलिमिटेड डॉक्टर कंसल्टेशनचे बेनेफिट मिळेल.

> याशिवाय डाएट प्लॅनही तयार केला जाईल.

https://t.co/kZayWi3hzU?amp=1

Yes Bank Wellness Card Plus चे फायदे

> वेलनेस प्लस कार्डची किंमत 2,999 रुपये प्लस टॅक्स अशी आहे.

> यामध्ये तुम्हाला फार्मसीशी संबंधित प्रत्येक 2000 रुपयांसाठी 30 रिवॉर्ड पॉईंट्स मिळतील.

> इतर खर्चामध्ये खर्च केलेल्या प्रत्येक 200 रुपयांना 6 रिवॉर्ड पॉईंट्स मिळतील.

> यासह वार्षिक प्रिवेंटिव हेल्थ चेकअप केले जाईल, ते 31 निकषांवर असेल.

> दरमहा 12 फिटनेस सेशन असतील ज्यांच्या पर्यायांमध्ये जिम, योगा आणि झुम्बा यांचा समावेश आहे.

> याद्वारे तुम्हाला अनलिमिटेड डॉक्टर कंसल्टेशन चे बेनेफिट मिळेल.

> आपल्या ठरवलेल्या लक्ष्यानुसार डाएट प्लॅन तयार केला जाईल.

> आपल्याला फ्री ऑनलाइन कंसल्टेशन आणि फिटनेस असेसमेंटचा लाभ देखील मिळेल.

> एअरपोर्ट लॉन्ज एक्सेस, कॉन्टॅक्टलेस पेमेंटचे बेनेफिट ही उपलब्ध आहे.

https://t.co/Hw8U9oOBDn?amp=1

आदित्य बिर्ला मल्टीपल अ‍ॅपचे फायदे

> सेंटरवर जिम, योगा आणि झुम्बा

> होम बेस्ड वर्कआउट सेशन

> वार्षिक हेल्थ चेकअप

> राउंड द क्लॉक डॉक्टर किंवा काउंसेलर हेल्पलाइन

> डाएट प्लॅन

https://t.co/C0TGSHbyNM?amp=1

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment