Wednesday, June 7, 2023

2892 कोटींच्या वसुलीसाठी Yes Bank ने मुंबईतील अनिल अंबानी समूहाचे मुख्यालय घेतले ताब्यात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । खासगी क्षेत्रातील येस बँकेने मुंबईतील अनिल धीरूभाई अंबानी (एजीडीजी) या ग्रुप रिलायन्स सेंटरचे मुख्यालय ताब्यात घेतले आहे. बुधवारी फायनान्शियल एक्स्प्रेसमधील एका जाहिरातीमध्ये बँकेने मुंबईतील सांताक्रूझच्या 21,000 चौरस फुटांचे रिलायन्स मुख्यालय ताब्यात घेणार असल्याची माहिती दिली होती. याखेरीज दक्षिण मुंबईतील नागिन महालचे दोन मजलेही बँकेने जप्त केले आहेत. Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act (SARFESI) अंतर्गत 22 जुलै रोजी बँकेने ही जप्ती केली.

येस बँकेच्या ADAG समूहाकडे 2892 कोटी रुपयांची थकबाकी असून कंपनी त्याची परतफेड करू शकली नाही. या समूहाने येस बँकेकडून एकूण 12,000 कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे

यावर्षी मार्चमध्ये अनिल अंबानी यांनी ईडी (एन्फोर्समेंट डायरेक्टरेट) अधिकाऱ्यांना सांगितले की येस बॅंकेने ADAGला दिलेली सर्व कर्जे सुरक्षित आहेत आणि ती नियमानुसार देण्यात आली आहेत. ते म्हणाले की, ADAG समूहाचे राणा कपूर, त्यांची पत्नी आणि त्यांच्या मुलींचा कंपनीमध्ये थेट किंवा अप्रत्यक्षरित्या गुंतवणूक नाही.

अनिल धीरूभाई अंबानी समूहाची स्थापना अनिल अंबानी यांनी 10 जुलै 2006 रोजी केली होती. त्याचे मुख्यालय सांताक्रूझ (मुंबई) मध्ये 21,432 चौरस मीटरवर पसरलेले आहे. रिलायन्स पॉवर, रिलान्स इन्फ्रास्ट्रक्चर, रिलायन्स कॅपिटल, रिलायन्स एंटरटेनमेंट, रिलायन्स हेल्थ आणि रिलायन्स मीडियावर्क्स या सर्व कंपन्यांचे हे मुख्यालय आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठीआम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.