‘हो! भाजप हा माझ्या बापाचा पक्ष पण… ‘- पंकजा मुंडे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद । ‘भाजप हा माझ्या बापाचा पक्ष आहे आणि त्याचा मला अहंकार नाही, तर प्रेम आहे. त्यामुळे माझ्या बापाच्या पक्षाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार”, असं विधान भाजपा नेत्या पंकजा मुंडेंनी केलं आहे. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपच्या शिरीष बोराळकरांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यावेळी भाजप नेत्या पंकजा मुंडे उपस्थित होत्या.

एका व्यक्तीचं तिकीट कापून मी शिरीष बोराळकर यांच्या कार्यक्रमाला आले, त्यामुळे जो काही मेसेज द्यायचा तो मी दिला आहे. असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. सर्व वर्गांना समान न्याय मिळावा ही आमची भूमिका आहे. माझ्यावर पक्षाचे आणि बापाचे संस्कार आहेत. त्यामुळे मी पूर्ण काम करेन, असंही पंकजा मुंडेंनी सांगितलं आहे.

तर गेल्या काही दिवसांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील जिल्ह्यात आलेले असताना त्यांच्या दौऱ्याकडे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी पाठ फिरवल्यामुळे त्या नाराज असल्याची जोरदार चर्चा रंगली होती. त्यावर पंकजा मुंडे यांनी ट्विट करत आपण मराठवाडयातील बैठकांना उपस्थित राहू शकत नाही, असे या आधीच सांगितले होते, असे स्पष्टीकरण देत पंकजा मुंडे यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला होता.  (BJP Is My Father’s Party, Its My Love Says Pankaja Munde)

ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in

 

Leave a Comment