कोरोना संकटात योगा आशेचा किरण – पंतप्रधान मोदी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आज आंतरराष्ट्रीय योगा दिना निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील नागरिकांना संबोधित केलं. जेव्हा कोरोनाच्या अदृश्य विषाणूने जगभरात पाय पसरले त्यावेळी कोणताही देश साधनं, सामर्थ आणि मानसिकदृष्ट्या यासाठी तयार नव्हता. परंतु आपण सगळ्यांनी पाहिले की, अशा कठीण प्रसंगी योगासने आत्मविश्वास वाढवण्याचे मोठे माध्यम बनले. योगमुळे लोकांचा विश्वास वाढला की, या महामारीविरोधात आम्ही लढू शकतो, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

मोदी म्हणाले, जगातील बहुतांश देशांसाठी योग दिन हा त्यांच्या संस्कृतीचा भाग नाही. पण या कठीण समयी, एवढ्या अडचणीत लोक योग विसरु शकत होते. परंतु त्याउलट योगासनांनी लोकांचा उत्साह वाढवला आहे, योगासनांमुळे प्रेम वाढलं आहे. योगासनांमुळे तणावापासून मजबुतीपर्यंत आणि निगेटिव्हिटीपासून क्रिएटिव्हिटीचा मार्ग दाखवतो, असं मोदी म्हणाले.

भारताने यूएनमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनाचा प्रस्ताव ठेवला त्यावेळी योगासनाचं महत्त्व संपूर्ण जगभरात समजावं ही एकमेव भावना होती. आज या दिशेने भारताने संयुक्त राष्ट्र आणि जागतिक आरोग्य संघटनेसोबत मिळून आणखी एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. आता जगाला M-Yoga अॅपची शक्ती मिळणार आहे. या अॅपमध्ये कॉमन योग प्रोटोकॉलच्या आधारावर योग प्रशिक्षणाचे अनेक व्हिडीओ जगातील विविध भाषांमध्ये उपलब्ध असतील असे मोदींनी सांगितले.

 

Leave a Comment