जर तुम्ही देखील बँकेत FD केली असेल तर ‘या’ महत्वाच्या गोष्टी जाणून घ्या, ज्याद्वारे आपल्याला नेहमी मिळेल नफा…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । सर्व प्रकारच्या बचत योजनांमध्ये (Savings Schemes) फिक्स्ड डिपॉझिट (Fixed Deposits) हा लोकांचा सर्वाधिक पसंतीचा गुंतवणूकीचा पर्याय आहे. सर्व वयोगटातील लोकांना बचत करण्याची ही पद्धत आवडते. याचे सर्वात मोठे कारण हे आहे की, ते इतर योजनांपेक्षा अधिक सुरक्षित आणि कमी जोखिम असलेला आहे. यात अल्प ते दीर्घ मुदतीसाठीही गुंतवणूक केली जाऊ शकते. आज आम्ही तुम्हाला एफडी संबंधित नियम, कर यासह बरीच माहिती देणार आहोत…तसेच या बचत योजनेचा अधिक चांगला फायदा आपण सहजपणे कसा घेऊ शकतो हे जाणून घ्या…

एफडीचे दोन प्रकार आहेत
साधारणपणे एफडी दोन प्रकारची असते. पहिली कम्युलेटिव्ह एफडी तर दुसरी नॉन-कम्युलेटिव्ह एफडी आहे. तिमाही आणि वार्षिक आधारावर व्याज मिळते. मात्र, आपण नियमित अंतराने व्याज देखील घेऊ शकता.

एफडीमध्ये गुंतवणूक करण्याचे ‘हे’ फायदे आहेत

> फिक्स्ड डिपॉझिट हा सर्वात सुरक्षित गुंतवणूकीचा पर्याय मानला जातो.

> त्यात जमा झालेल्या मूळ पैशांवर कोणताही धोका नसतो. याव्यतिरिक्त, निश्चित कालावधीत तुम्हाला परतावा देखील मिळू शकेल.

> त्यात गुंतवणूक केलेले मूळ पैसे सुरक्षित आहेत कारण बाजारातील चढउतारांचा थेट परिणाम एफडीवर होत नाही.

> या योजनेंतर्गत गुंतवणूकदार मासिक तत्वावर व्याज घेऊ शकतात.

> साधारणपणे एफडीवरील व्याज दर जास्त असतो. ज्येष्ठ नागरिकांसाठी ते सर्वाधिक परतावा देते.

> कोणत्याही एफडीमध्ये एकदाच गुंतवणूक करावी लागेल. यानंतर जर गुंतवणूकदारास अधिक डिपॉझिट जमा करायांच्या असतील तर त्यांना स्वतंत्र एफडी खाते उघडावे लागेल.

https://t.co/hprYp84wi0?amp=1

> एफडीचा मॅच्युरिटी कालावधी असतो, तुम्हाला या वर्षासाठीच पैसे जमा करावे लागतील. परंतु याचा एक फायदा हा देखील आहे की, आवश्यक असल्यास आपण वेळेपूर्वी पैसे काढू देखील शकता तथापि, आपण मॅच्युर होण्यापूर्वी एफडी तोडल्यास तुमचे व्याज कमी होते, तुम्हाला त्यासाठी काही दंड भरावा लागेल. जो वेगवेगळ्या बँकांमध्ये वेगवेगळा आहे.

https://t.co/2OfePxfxWJ?amp=1

एफडीवरील कर कपातीचा नियम काय आहे
फिक्स्ड डिपॉझिटसवर 0 ते 30 टक्के टॅक्स कट केला जातो. गुंतवणूकदाराच्या आयकर स्लॅबच्या आधारे ही वजावट केली जाते. जर आपण एका वर्षामध्ये 10,000 रुपयांपेक्षा अधिक पैसे कमविले तर आपल्याला आपल्या एफडीवर 10 टक्के कर भरावा लागेल. तथापि, यासाठी तुम्हाला पॅनकार्डची कॉपी जमा करावी लागेल. पॅन कार्ड जमा केले नाही तर त्यावर 20% टीडीएस वजा केले जातात. जर गुंतवणूकदारास कर कपात टाळायची असेल तर त्याने फॉर्म 15A त्याच्या बँकेत जमा करावा लागेल. जे कोणत्याही आयकर स्लॅबमध्ये येत नाहीत त्यांना हे लागू होते. कर कपात टाळण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी फॉर्म 15H एच सादर करावा.

https://t.co/9TXrR8vXGS?amp=1

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment