Monday, February 6, 2023

युवकांनी घेतला पुढाकार ; जिल्ह्यातील दोन कोविड सेंटरला स्ट्रीमर मशीन (वाफेचे यंत्र ) तरुणाकडून भेट

- Advertisement -

औरंगाबाद | देशभरात सध्या रेमडीसीवीर ऑक्सिजन आणि अशाच अनेक औषधांचा त्याचप्रमाणे वैद्यकीय यंत्रांचा तुटवडा बऱ्याच ठिकाणी निर्माण झाला आहे.त्यातच वाफ घेण्याचे यंत्र म्हणजेच स्टीमर मशीन याचाही समावेश आहे

हा तुटवडा दूर करण्यासाठी औरंगाबाद शहरातील काही तरुणांनी पुढाकार घेतला आहे. ही कल्पना पराग राठोड या युवकाला सर्वप्रथम सुचली पराग पॉझिटिव्ह असताना त्याने covid-19 वार्डाची गरज ओळखून आपल्या मित्रांसोबत चर्चा केली. त्या चर्चेतून सर्वांनी निर्णय घेऊन आणि शासकीय तांत्रिक महाविद्यालय व सिपेट कॉलेजच्या कोवीड सेंटरला वाफेचे यंत्रचे वाटप करायचे ठरवले.

- Advertisement -

दरम्यान यासाठी शंभर ते दीडशे तरुणांनी पैसे जमा केले. या दोन्ही कोवीड सेंटरवर शेकडो स्टीमर मशीन वाटण्यात आले. दोन्ही कोवीड सेंटरच्या व्यापस्थापनाने या तरुणाचे कौतुक केले.