प्रेम करून चूक झाली म्हणत धावत्या रेल्वे समोर तो झोपला अन नंतर…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद । एका मुलीवर प्रेम करून माझी चूक झाली. त्यामुळेच माझ्यावर आत्महत्येची वेळ आली. अशी सुसाईड नोट लिहून 25 वर्षीय तरुणाने धावत्या रेल्वे समोर जीव दिल्याचा धक्कादायक प्रकार छावणी रेल्वे उड्डाणपुला खाली सकाळी उघडकीस आला. ऋषिकेश भाऊसाहेब लहाने वय-25 (रा.बजाजनगर) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.सोमवारी सकाळी घडलेल्या या घटनेचे कारण आज पोलीस तपासातून समोर आले आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, प्रेमभांग झाल्याने अनेक जणांनी आत्महत्या केल्याची घटना ऐकायला मिळतात. अशीच काहीशी घटना औरंगाबादेत सोमवारी घडली. मुळ कन्नड तालुक्यातिल ऋषिकेश हा काही वर्षांपासून वाळूज औधोगिक वसाहतीतील बजाजनगर भागात वास्तव्यास होता. त्याचा सकाळी 8 वाजेच्या सुमारास रेल्वे रुळावर धडा वेगळा झालेला मृतदेह नागरिकांना आढळून आला. नागरिकांनी या बाबत पोलिसांना काळविताच छावणी पोलिसांनी घटनस्थळी धाव घेत.मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयाच्या शवविच्छेदन गृहात हलविले. तेथे मृतदेहाची तपासणी केली असता मृताच्या पॅन्टच्या खिशात एक चिट्ठी पोलिसांना आढळून आली.

चिट्ठी मध्ये एका मुलीवर प्रेम करून माझी चूक झाली. मी आत्महत्या करीत आहे. माझ्या आत्महत्येला कोणीही जबाबदार नाही असे मजकूर आढळून आले. खिशातील कागदपत्रावरून तरुणाची पोलिसांनी ओळख पटविली. या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave a Comment