लग्नानंतरची मधुचंद्राची रात्र ठरली अखेरची रात्र, शारीरिक संबंधांदरम्यान 18 वर्षांच्या तरुणीचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – लग्नानंतरच्या गोड आठवणी अनेक जोडप्यांसाठी आनंद देऊन जातात. पण अशा पण काही आठवणी असतात त्या आयुष्यभराचे दुःख देऊन जातात. अशाच प्रकारची घटना एका जोडप्यासोबत घडली आहे. यामध्ये एका जोडप्याच्या लग्नाची पहिली रात्र वधूच्या आयुष्याची अखेरची रात्र ठरली आहे. हि घटना ब्राझीलमधील इबिराईट शहरात घडली आहे.

या तरुणीचा पहिल्याच रात्री शारीरिक संबंधांदरम्यान मृत्यू झाला आहे. या 18 वर्षांच्या तरुणीचा विवाह 29 वर्षांच्या तरुणाशी झाला होता. रात्री शारीरिक संबंधांदरम्यान तिला अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. शवविच्छेदनाच्या अहवालात तिच्या शरीरावर कोणत्याही प्रकारची जखम नव्हती. पण त्या तरुणीला ब्राँकायटिसचा त्रास होता.

या आजारात श्वसननलिकेला सूज येते. यामुळे फुफ्फुसांना प्राणवायू मिळण्यास अडथळा निर्माण होतो. जर हि सूज आली तर फुफ्फुसांमध्ये कफ जमा होतो. याच त्रासामुळे या तरुणीला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यानंतर तिचा मृत्यू झाला.