व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

महिलेसह दोघांकडून तरुणाला भररस्त्यात मारहाण

बीड : हॅलो महाराष्ट्र – बीड-सोलापूर महामार्गावरील रौऊळगाव चौकात दोन जणांनी एका महिलेसह एका तरुणाला बेदम मारहाण केली आहे. या तरुणाला पैशाच्या व्यवहारातून मारहाण करण्यात आले असल्याचे समजत आहे. हा सगळा प्रकार महामार्गावर घडल्याने अनेकांनी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी काही लोकांनी मध्यस्थी करून हा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काही उपयोग झाला नाही. जवळपास 1 तास हा सगळा प्रकार सुरु होता. तिकडच्या काही लोकांनी आपल्या मोबाईलमध्ये या घटनेचा व्हिडिओ शूट केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
बीड-सोलापूर महामार्गावरील अंजनवती या ठिकाणी राहणाऱ्या पीडित तरुणाने त्याच परिसरातील वाणगाव येथील एका व्यक्तीचे पैसे घेतले होते. वारंवार पैसे मागूनदेखील पीडित तरुण पैसे देत नव्हता. यामुळे वैतागून आरोपींनी हा रस्ता अवलंबला. यानंतर एकाच कुटुंबातील तिघांनी मिळून बीड-सोलापूर महामार्गावरील रौऊळसगाव चौकात संबंधित तरुणाला मारहाण केली. यामध्ये एका महिलेचादेखील समावेश होता.

जवळपास सुमारे एक तास हा सगळा प्रकार सुरु होता. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी निर्माण झाली होती. यावेळी आजूबाजूच्या लोकांनी मध्यस्थी करून हि भांडणे सोडवण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काही उपयोग झाला नाही. मारहाण करणारे तिघेजण ऐकण्याच्या तयारीत नव्हते. पैशांच्या देवाण-घेवाणीतून भररस्त्यात या तिघांनी गुंडागर्दी करत तरुणाला मारहाण केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे पोलीस आता तिघांवर काय कारवाई करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.