औरंगाबाद : माझ्या आत्महत्येस कोणीही जबादार नाही, असे उर्दुमध्ये सुसाईड नोट लिहून हार्डवेअर दुकानातील मजुराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी रात्री समोर आली आहे.शेख असिफ शेख अन्वर (वय 36) रा. सलमा मशीद जवळ,संजय नगर असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
या तरुणाने राहत असलेल्या वाड्यातील बदामाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी रात्री हि घटना उघडकीस आले. असिफ हे बायजीपुरा भागातील एका हार्डवेअरच्या दुकानात काम करत होता. लॉकडाऊन मुळे काम कमी झाल्याने बहुंताश वेळेला ते घरीच राहत असे.
सोमवारी त्याच्या कुटूंबातील इतर सदस्य लग्नात सहभागी होण्यासाठी गेले होते. त्या दरम्यान घरात एकटेच असताना वाड्यातील झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. लग्न आटोपून घरी परतलेल्या कुटुंबियांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर आसिफला तत्काळ घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.पोलिसांच्या तपासणीत त्यांच्या खिशात सुसाईड नोट आढळून आली ती उर्दु भाषेत लिहिलेली आहे. जिन्सी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू असल्याचे जिन्सी पोलीस ठाण्याचे जमादार जगन्नाथ जेठर यांनी सांगितले.