पत्नी माहेरी जाताच २१ वर्षीय प्रेयसी सोबत युवकाची आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्तीसगड मधील सुरगंज जिल्यातील दोन मुलाचा बाप असलेला आणि त्याची २१ वर्षाची प्रियसी यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. सरगुजा जिल्ह्यामधील गव्ह्ज गावात राहणारे विनोद हे दोन मुलांचे वडील होते.त्याचे आणि त्याच्या बायकोचे एकमेकांशी अजिबात जमत नव्हतं म्हणून काही दिवसांपूर्वी त्यांची बायको आपल्या दोन्ही मुलांना सोबत घेऊन आपल्या माहेरी निघून गेली. त्यानंतर त्याच्या घरात त्याच्याबरोबर त्याची २१ वर्षीय प्रेमिका राहू लागली . पत्नी माहेरी गेल्याचे समजताच ती पण त्याच्या सोबत राहू लागली . दोन दिवस ते खूप आनंदी होते, बाहेर फिरायला वगैरे जात होते. असे त्यांच्या शेजारच्यांनी सांगितले. अचानक त्यांनी आत्महत्या का केली हे कोणालाच ठाऊक नाही.

विनोद हे छोटीमोठी काम करतात. यावर त्याचा घरसंसार चालत होता. परंतु काही दिवसापासून यांच्या पत्नीला संशय आला होता. त्यानंतर अनेक वेळा घरात भांडण झाली म्हणून तिने घर सोडण्याचा निर्णय घेतला . त्याचे २१ वर्षीय मुलीबरोबर जवळपास ३ वर्षांपासून संबंध होते. ते दोघे एकत्र काम करत होते. तेव्हापासून एकमेकांना ओळखत होते. त्यानंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले.

विनोद २७ जुलै ला त्याची प्रेमिका आणि तो घरातून बाहेर जाताना दिसले ते खूप आनंदि होते. त्यानंतर एका दिवसात त्याचे दोघांची शरीरे गावाबाहेरील झाडाला लटकलेले दिसले. डॉक्टर येण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाला होता. पण ते प्रेमी युगल एकमेकांना भेटत आत्महत्या का केली याचा खुलासा पोलीस करत आहेत. विनोद यांची दोन मुले १२ आणि १५ वर्षाची आहेत. त्यामुळे त्या मुलांवरचे वडिलांचे छात्र हरवले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment