धुळवडीच्या रंगापासून वाचण्याच्या नादात 26 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अंबरनाथ : हॅलो महाराष्ट्र – मुंबईमधील अंबरनाथमध्ये एक एक मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये धुळवडीच्या दिवशी रंग लावण्यासाठी आलेल्या मित्रांपासून लपण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. रंगापासून बचाव करण्यासाठी हा मृत तरुण एका इमारतीवर चढला होता. मात्र त्यावेळी त्याचा तोल गेल्याने तो थेट जमीनीवर कोसळला. या घटनेत या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. हि घटना उघडकीस येताच परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
अविनाश पाटील असे मृत तरुणाचे नाव असून तो अंबरनाथ पूर्व परिसरातील शिवाजीनगर याठिकाणी वास्तव्याला होता. घटनेच्या दिवशी शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास अविनाश आपल्या लहान भावासोबत एका इमारतीच्या खाली उभा होता. यावेळी धुळवड साजरी करण्यासाठी त्यांचे काही मित्र अविनाश आणि त्याच्या लहान भावाला रंग लावण्यासाठी आले होते. रंग घेऊन आलेल्या मित्रांना पाहताच अविनाश आणि त्याच्या भावाने इमारतीच्या दिशेनं धूम ठोकली. यावेळी त्या मित्रांनी अविनाशच्या भावाचा पाठलाग करत त्याला पहिल्या मजल्यावर गाठलं आणि त्याला रंग लावत खाली आणलं.

यादरम्यान अविनाश रंग लावण्यापासून वाचण्यासाठी इमारतीच्या गच्चीवर चढलेला यावेळी त्याचा अचानक तोल ढासळला आणि तो थेट खाली कोसळला. यामुळे अविनाशचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून अविनाशचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालयात पाठवला. हि घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली. ऐन धुळवडीच्या दिवशी तरुणाचा अशाप्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Leave a Comment