दोस्तीत कुस्ती! ‘या’ कारणामुळे जिवलग मित्रानेच केली मित्राची हत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमरावती : हॅलो महाराष्ट्र – अमरावतीत मैत्रीच्या नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका तरुणाने मित्राच्या पत्नीशी असलेल्या अनैतिक संबंधातून आपल्या जीवलग मित्राचाचा खून केला आहे. आरोपीने मित्राला गावाबाहेर निर्मनुष्य ठिकाणी नेले आणि तिकडेच त्याची गळा आवळून हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मित्राला अटक केली आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
नरेश गणेश पवार असे आरोपी तरुणाचे नाव आहे. तो दुधाचा व्यवसाय करत होता. अमरावती ग्रामीण पोलिसांच्या एलसीबी आणि कुऱ्हा पोलिसांनी या आरोपीला अटक केली आहे. आरोपी नरेशचं आपल्या मित्राच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते. मागच्या बऱ्याच दिवसापासून मित्राच्या पाठीमागे त्याच्या बायकोबरोबर हे चाळे सुरु होते. मात्र त्याच्या अनैतिक संबंधात मित्र अडसर ठरत होता. त्यामुळे त्याने आपल्या मित्राच्याच हत्येचा कट रचला.

तसेच आरोपीने विम्याचे पैसे हडप करण्यासाठी मित्राच्या जीवन विम्याचा साडेदहा हजारांचा हफ्ता देखील भरला. या विम्याचा हफ्ता भरल्यानंतर दहा दिवसांनी आरोपीने आपल्या जीवलग मित्राचा खून केला. घटनेच्या दिवशी आरोपी नरेश हा आपल्या मित्राला घेऊन गावाबाहेर निर्मनुष्य ठिकाणी घेऊन गेला आणि त्या ठिकाणीच त्याची गळा आवळून हत्या केली. त्या दिवशी रात्री उशिरापर्यंत मृत घरी न आल्याने कुटुंबीयांनी त्यांची सर्वत्र शोधाशोध केली. मात्र त्याचा कुठेच पत्ता लागला नाही. यानंतर दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह आढळून आला. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास केला असता आरोपीचे आणि मृताच्या पत्नीच्या अनैतिक संबंधाबद्दल समजले. यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा कबुल केला आहे. तसेच पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Leave a Comment