तरुणांनो राजकारणात यायचं तर हे तीन “एम” पाहिजेच; आमदार दिलीप मोहिते यांनी दिला सल्ला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तरुणांनो राजकारणात येऊ नका कारण राजकारणात यायचं असेल तर तीन एम पाहिजेच. ते तीन एम म्हणजे “मॅन पॉवर, मनी पॉवर आणि मसल पॉवर” असं सांगत आळंदी – खेडचे आमदार दिलीप मोहिते यांनी तरुणांनी राजकारणात येण्यापेक्षा उद्योगधंद्यात करियर करावे असा सल्ला देखील दिला.

मोहिते यांनी आज खेड तालुक्यातल्या सत्करस्थळ ग्रामपंचायत हद्दीतील एका काँकीट्रीकारण झालेल्या रस्त्याच्या लोकार्पण सोहळ्याला आले होते.त्यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. त्यावेळी बोलतांना मोहिते पुढे म्हणाले की,”आता राजकारण हे करिअरच्या दृष्टीने योग्य क्षेत्र राहिलेलं नाही. तसेच दिवसेंदिवस राजकारणाचे डायनॅमिक बदलत आहेत. म्हणून इकडे येण्यापेक्षा तुम्ही इतर व्यवसायात उतरा. तिकडे खूप संधी आहेत असेही ते म्हणाले.

प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे, माजी सरपंच अजय चव्हाण, लोकनियुक्त सरपंच संजीवनी थिगळे, उपसरपंच धनश्री सांडभोर, भाग्यश्री राळे, वैशाली बांगर, वैशाली मारणे, कालिदास सातकर, साहेबराव सातकर, अ‍ॅड.गिरीश कोबल, खंडू थिगळे, जगन्नाथ राक्षे व ग्रामस्थ उपस्थित होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like