ट्रेनचे तिकिट होणार महाग, आता देशातील 1000 पेक्षा जास्त स्थानकांवर द्यावा लागणार User Charge

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आता आपल्याला रेल्वेने प्रवास करण्यासाठी जास्त पैसे खर्च करावे लागतील. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी विनोदकुमार यादव (V K Yadav) यांनी सांगितले की, विमानतळांसाठी युझर चार्ज लावल्याप्रमाणे आता काही रेल्वे स्थानकांवरही युझर चार्ज आकारला जाईल. दरम्यान, नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत म्हणाले की,’खासगी गाड्यांचे भाडे बाजारपेठेनुसार निश्चित केले जाईल. प्रवाशांना व्हॅल्यू एडेड सर्विस देखील देण्यात येतील.

अशा रेल्वे स्थानकांमधील प्रवाशांकडून युझर चार्ज आकारले जाईल
रेल्वेने आज जाहीर केले की, एकूण रेल्वे स्थानकांपैकी 10 ते 15 टक्के स्थानकांवर युझर चार्ज आकारला जाईल. CRB आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितले की, 1050 स्थानकांवर प्रवाश्यांची वर्दळ वाढेल. प्रवाश्यांमध्ये वाढ झाल्याने स्थानकांची क्षमता वाढविण्यासाठी त्याची पुनर्रचना (Railway Station Redevelopment) करण्यात येईल. या स्थानकांवर युझर चार्ज घेतले जाईल. देशात भारतीय रेल्वेची सुमारे 7000 रेल्वे स्थानके आहेत.

किती युझर चार्ज आकारला जाईल
CRB व्ही.के. यादव यांनी माहिती दिली आहे की, रेल्वे युझर चार्ज बाबत लवकरच एक नोटिफिकेशन जारी करेल. मात्र, युझर चार्ज किती असेल या प्रश्नावर ते म्हणाले की,’ युझर चार्ज म्हणून थोडी रक्कम घेतली जाईल.’ रेल्वेने अशी माहिती दिली आहे की, मोठ्या रेल्वे स्थानकांवर आणि गर्दी असलेल्या रेल्वे स्थानकांमध्ये युझर चार्ज आकारला जाईल. प्रवासी भाड्याच्या तिकिटाबरोबरच हे शुल्क आकारले जाईल.

रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष म्हणाले की, 24 मार्चपर्यंत हाय डेंसिटी रुट्स वर डबलिंग, ट्रिपलिंग आणि इलेक्ट्रिफिकेशन पूर्ण केले जाईल. डिसेंबर 2020 पर्यंत गांधी नगर आणि हबीबगंज स्थानकांचे Redevelopment होईल, असे त्यांनी सांगितले.

खासगी गाड्यांचे भाडे बाजारपेठेनुसार निश्चित केले जाईल
या पत्रकार परिषदेत नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांतही उपस्थित होते. खासगी गाड्यांचे भाडे आता बाजारपेठेनुसार निश्चित केले जाईल, असे कांत म्हणाले. प्रवाशांना व्हॅल्यू एडेड सर्विस देखील दिली जाईल. खासगीकरणातून रेल्वेमध्ये सुमारे 30 हजार कोटी रुपयांची खासगी गुंतवणूक होणे अपेक्षित आहे.

खासगी ट्रेन आल्यानंतर रेल्वे बंद होणार नाही
आम्ही रेल्वेचे खाजगीकरण करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. खासगी कंपनी रेल्वेच्या इंफ्रास्ट्रक्चरचा वापर करेल. ते म्हणाले की,” एसबीआय खासगी बँकेत आल्यानंतर बंद झाली नाही. इंडिगो, विस्तारा आल्यानंतर एअर इंडिया थांबलेली नाही. अशा खासगी गाड्यांच्या आगमनानंतर भारतीय रेल्वे थांबणार नाही, परंतु क्षमता आणि स्पर्धा मात्र आणखी वाढेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment