बंडातात्या कराडकरांची परफेक्ट पोलखोल; ‘हा’ व्हिडिओ पहाच

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून सातत्याने आपल्या वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत असलेल्या जेष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या बद्दलपुन्हा एकदा वादग्रस्त विधान करत त्यांचा म्हातारा असा एकेरी उल्लेख केला. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांनी बंडातात्यांवर निशाणा साधत कडक शब्दांत त्यांची पोलखोल केली आहे.

हनुमंत पवार म्हणाले, राजगुरूनगर येथे भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या शहीद दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात बंडा कराडकर या महाशयांनी महात्मा गांधीजीं विषयी अपशब्द वापरले, गांधीजींच्या अहिंसेच्या शिकवणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, लोकमान्य टिळक, भगतसिंग यांच्याबद्दल असत्य माहिती पसरवली, या महामानवांच्या तोंडी धादांत खोटी विधाने घालून इतिहासाचा विपर्यास केला. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस, प्रवक्ता या नात्याने मी कराडकरांचा निषेध करतो. कराडकरांनी माफी मागून महात्मा गांधीजीं विषयीचे विधान मागे घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

https://www.facebook.com/watch/?v=366871988649205

महात्मा गांधीजींनी बुरा मत सुनो, बुरा मत बोलो, बुरा मत देखो ची शिकवण देशभरातील जनतेला दिली. कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे, जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, अवघाची संसार सुखाचा करिन या वारकरी शिकवणीचा गांधीजींच्या विचारांवर मोठा प्रभाव होता. बंडातात्या तुमची वाणी रसाळ तर नाहीच आणि मानाने तुम्हाला निर्मळ म्हणायला आता आमचं मन धजवत नाही.

वारकर्यांनी भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस चले जावो चळवळीच्या लढयाला पाठिंबा देण्यासाठी भारतीय काँग्रेसची खादीची टोपी स्वीकारली. आजही गांधी टोपी ही भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे मोल सांगणारी आहे. स्वातंत्र्य लढ्यात वारकऱ्यांचा काय रोल होता हे सांगण्याची निशाणी म्हणजे गांधी टोपी ही तुमच्याही डोक्यावर होती. ती गांधी टोपी तुम्हाला झाली असली आणि गांधीजींचा इतका द्वेष करत असाल तर जरा वारकरी संप्रदाय आणि स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास संघाचा चष्मा काढून अभ्यासा असा टोला त्यानी लगावला.

बंडातात्या, तुम्ही गांधींचा द्वेष करता, मत्सर करता, गांधीजींच्या सोबत १५-२० वर्षे स्वातंत्र्य लढ्यात सहभाग असलेल्या लोकांचा तुम्ही द्वेष करताय. पण तुम्हाला चले जाओ चळवळ कळलेली नाही. तुम्हाला ऑगस्ट क्रांती कळलेली नाही, आणि हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन सांगणारा आणि मी नास्तिक का आहे सांगणारा भगतसिंग पण तुम्हाला समजलेला नाही. ज्यांनी कधीही ब्रिटिशांविरोधात आंदोलन केलं नाही त्यांचेच तुम्ही अनुयायी शोभता, प्रवक्ते शोभता असे हनुमंत पवार यांनी म्हंटल.

बंडातात्या कराडकरांना महात्माजींची अहिंसा, महात्माजीचा सत्याग्रह, भगतसिंगांचं क्रांतीचे तत्वज्ञान आणि लोकमान्य टिळक यांचं गीतारहस्य कळलेलं नाही. ते त्यांना कळवूनही घ्यायचं नाही. त्यांनी खुशाल “बंच ऑफ थॉट” पारायणे करावी. बंडा कराडकर यांनी महात्मा गांधीजीबद्दल अपप्रचार बंद करावा, अपमानजनक भाषा थांबवावी, कालचे वादग्रस्त विधान मागे घ्यावे, महाराष्ट्राची आणि गांधीजींना राष्ट्रपिता मानणाऱ्यांची तुम्ही हात जोडून माफी मागितली पाहिजे अशी मागणी हनुमंत पवार यांनी केली

Leave a Comment