तलावाच्या सांडव्यात बुडून युवकाचा मृत्यू 

औरंगाबाद | हर्सुल तलावाच्या पाण्याच्या सांडव्याजवळ असलेल्या खदानीत बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास उघडकीस आली. अग्निशमन दलाच्या सुत्रांनी सदर घटनेबाबत माहिती दिली आहे.

आसीफ कुरैशी (वय ३०) रा. हर्सुल परिसर बुडालेल्या युवकाचे नाव आहे. जटवाडा रोडवरील हर्सुल परिसरात राहणारा आसीफ कुरैशी हा मंगळवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास हर्सुल तलावाच्या पाण्याच्या सांडव्याजवळील खदानीत पडला होता. खदानी असलेल्या पाण्यात आसीफ कुरैशी बुडाला असल्याचा प्रकार लक्षात आल्यावर काही युवकांनी याची माहिती अग्निशमन दलाला दिली.

अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी आर.के.सुरे, उपमुख्य अग्निशमन अधिकारी डी.डी.साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली डयुटी इंचार्ज मोहन मुंगसे, विनायक लिमकर, समीर शेख, शशीकांत गिते, अखय नागरे, अशोक पोटे,आमेर शेख,तन्वीर शेख, परमेश्वर साळुंके, शिवसंभा कल्याणकर, परेश दुधे, सुभाष दुधे आदींच्या पथकाने घटनास्थळी धाव घेवून पाण्यात बुडालेल्या आसीफ कुरैशी याचा मृतदेह सायंकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास पाण्याबाहेर काढला. या घटनेची नोंद हर्सुल पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

You might also like