पॅरासिटामॉलच्या गोळ्यांचा ओव्हरडोस आला अंगलट, वर्ध्यात युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वर्धा : हॅलो महाराष्ट्र – वर्धा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका तरुणाने पॅरासिटामॉल गोळ्यांचा ओव्हरडोज घेतल्याने त्याला आपला जीव गमवावा लागला आहे. या तरुणावर रुग्णालयात तब्ब्ल 40 दिवस उपचार सुरु होते. या तरुणाने एवढ्या मोठ्या प्रमाणात ओव्हरडोज घेतला होता कि डॉक्टरांनासुद्धा त्याला वाचवण्यात यश आले नाही. याप्रकरणी वर्धा शहर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रजत मेंढे असे या मृत तरुणाचे नाव आहे. तो शिवाजी चौक येथील रहिवासी आहे. तसेच तो वर्ध्याच्या एका खासगी फायनान्स कंपनीमध्ये सुरक्षा रक्षकाचे काम करत होता.

उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू
रजत मेंढे हा 29 जानेवारी रोजी रात्री आपल्या ड्युटीवर होता. सकाळी तो तेथेच झोपून होता. यानंतर 30 जानेवारी रोजी सकाळी त्याने वडिलांना फोन करून आपली तब्येत बिघडली असल्याचे सांगितले. यानंतर त्याच्या वडिलांनी त्याला तातडीने वर्ध्यात येत त्याला सेवाग्राम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सेवाग्राम रुग्णालयात रजतवर उपचार सुरू करण्यात आले. जेव्हा डॉक्टरांनी विचारपूस केली असता, त्याने पॅरासिटामॉलच्या गोळ्या खाल्ल्याचे सांगितले.

यादरम्यान सेवाग्राम रुग्णालयात त्याच्यावर तब्बल 40 दिवस उपचार सुरु होते. मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. डॉक्टरांना मृत रजत मेंढे याला वाचवण्यात अपयश आले आणि त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी सुरूवातीला सेवाग्राम पोलिसांत नोंद करण्यात आली. त्यानंतर हे प्रकरण वर्धा पोलिसांकडे वर्ग करण्यात आले. वर्धा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Leave a Comment