राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत ही देशातील तरुणांची इच्छा- नाना पटोले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील तरूणवर्ग राहुल गांधी यांना देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्याचं पाहू इच्छित आहे. देशाला दूरदृष्टी असलेला आणि सर्व घटकांना सोबत घेऊन जाणाऱ्या राहुल गांधींसारख्या नेतृत्त्वाची गरज असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हंटल. राहुल गाधींच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

नाना पटोले म्हणाले, देशातील तरूणवर्ग  राहुल गांधी यांना देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्याचे पाहू इच्छित असून राहुल गांधी हे मोदी सरकारविरोधात संघर्ष करत आहेत त्यांच्या या संघर्षाला ताकद देऊन महाराष्ट्रात काँग्रेसला क्रमांक एकचा पक्ष करण्याचा आपला संकल्प आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

दरम्यान, कोरोना संकट मोदी सरकारने अत्यंत बेजबाबदारपणे हातळल्याने देश 20 वर्ष मागे गेला. सामान्य लोकांचे संसार उघड्यावर आणलं. डॉ. मनमोहनसिंह, राहुल गांधी यांनी केलेल्या सूचनांचा विचार न केल्यामुळे देशाला मृत्यूच्या खाईत लोटलं असल्याचं म्हणत नाना पटोलेंनी भाजपवर निशाणा साधला.

You might also like