युवकांचा पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीवर हल्ला; भररस्त्यात फाडले कपडे आणि…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

चंदीगड : वृत्तसंस्था – पोलिसांबद्दल आपल्या मनात एक आदर असतो. पण काही लोक या पोलिसांच्या कुटुंबावर गंभीर हल्ले करतात. अशीच एक घटना चंदीगड या ठिकाणी घडली आहे. या घटनेमध्ये काही लोकांनी एका एसएचओच्या मुलीचे भररस्त्यात कपडे फाडले. यानंतर ती तरुणी पळून जात असताना ते लोक तलवारी हातात घेऊन तिचा पाठलाग करू लागले. पोलिसांनी या प्रकरणात 6 जणांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. हि घटना पंजाबच्या फिल्लौरमधील लुधियाना या ठिकाणी घडली आहे.

काय आहे प्रकरण
संबंधित महिला आपल्या माहेरी राहाण्यासाठी आली होती. मात्र मागच्या काही दिवसांपासून तिच्या मुलीची तब्येत खराब असल्याने ती आपल्या आठ महिन्यांच्या मुलीला भावासोबत फिल्लौरमधील एका रुग्णालयात घेऊन गेली होती.यानंतर जेव्हा ती आपल्या घराकडे जाण्यासाठी निघाली तेव्हा गावातीलच काही तरुणांनी तिला व तिच्या भावाला अडवले. यानंतर त्यानी आम्हाला का अडवलं? असा सवाल केला तेव्हा त्यांनी त्या महिलेच्या भावाला मारहाण करण्यास सुरुवात केली.

यादरम्यान त्या युवकांनी त्या महिलेचे कपडेदेखील फाडले. या नंतर या महिलेने आपल्या मुलीला घेऊन भावासोबत आपल्या घरी जायला निघाली तेव्हा त्या तरुणांनी हातात तलवारी घेऊन त्यांचा पाठलाग केला. या दरम्यान तरुणांनी त्यांच्यावर विटा आणि दगडाने वार केले. या हाणामारीत रस्त्यातील एका गाडीच्या काचाही फुटल्या.पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीला रस्त्यात अडवून तिचे कपडे फाडल्याप्रकरणी आणि पाठलाग केल्याप्रकरणी गोपा, लव आणि त्याच्या चार साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

Leave a Comment