YouTubeने iPhone-iPad यूजर्ससाठी आणले ‘हे’ खास फीचर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – व्हिडीओ प्लॅटफॉर्म असणाऱ्या YouTube ने iPhones आणि iPads साठी अखेर पिक्चर-इन-पिक्चर हा मोड जारी केला आहे. यामुळे यूजर्स आता डिव्हाइसवर दुसरे अ‍ॅप्स वापरताना युट्यूब व्हिडीओ पाहू शकणार आहेत. यूजर्सने YouTube अ‍ॅप बंद केल्यानंतर व्हिडीओ छोट्या विंडोमध्ये दिसणार आहे. या विंडोला यूजर्स स्क्रिनच्या इतर कॉर्नर्सला देखील हलवू शकणार आहेत.

यूट्यूबचे PiP फीचर अँड्राइड यूजर्ससाठी अँड्राइड Oreo पासूनच उपलब्ध आहे. यानंतर आता ते iOS यूजर्ससाठी जारी करण्यात आले आहे. युट्यूबने सांगितले कि हे फीचर त्याच iOS यूजर्ससाठी उपलब्ध होईल, ज्यांच्याकडे YouTube प्रीमियम सब्सक्रिप्शन असणार आहे. कंपनी लवकरच अमेरिकेत सर्व आयफोन यूजर्ससाठी हे फीचर लॉन्च करणार आहे.

या फीचरच्या मदतीने यूट्यूब व्हिडीओ आता मिनी प्लेयरमध्ये पाहता येणार आहे. या फीचरमुळे व्हिडीओ पाहताना देखील मोबाइलमधील इतर गोष्टी वापरता येणार आहे. जर तुमच्या यूट्यूबवर PiP मोड बंद असेल तर ते तुम्ही व्हिडीओ प्ले करून ते सुरू करू शकता. यानंतर तुम्ही होममध्ये जाण्यासाठी स्वाइप करा. तुम्ही स्वाइप केल्यानंतर व्हिडीओ लहान विंडोमध्ये सुरू राहणार आहे. या विंडोला तुम्ही स्क्रीनवर तुम्हाला हवे त्या ठिकाणी नेऊ शकता व रिसाइजसुद्धा करू शकता.

Leave a Comment