जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प 26 मार्च रोजी कोरोना काळात उत्पन्नाचा स्रोत खालावला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद |  जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प 26 मार्चला सादर होणार असून कोरोना काळात उत्पन्नाचा स्रोत आणि अनुदानावर झालेल्या परिणामाचा फटका यावर्षी जिल्हा परिषदेला मोठ्या प्रमाणात बसण्याची शक्यता आहे.

2020 आणि 2021 या आर्थिक वर्षात जिल्हा परिषदेची स्थायी समिती सभा शुक्रवारी 26 मार्च रोजी होणार आहे. या सभेत 2021 आणि 2022 चा अर्थसंकल्प सादर होणार असल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाकडून मिळाली आहे. दरम्यान 2020 आणि 2021 या वर्षाचा 47 कोटी 91 लाखाचा मूळ अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. मात्र यावर्षी कोरोनामुळे 2020 आणि 2021 मध्ये सामान्य उपकर वाढवू कर मुद्रांक शुल्क, पाणीपट्टीवरील उपकर यापैकी कोणतेही कर अद्यापही जिल्हा परिषदेला मिळालेले नाही.

कोरोना काळात उत्पन्नाचा स्रोत खालावला आहे. त्यामुळे २0२१ आणि २0२२ या वर्षीच्या अर्थसंकल्पावर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. दरम्यान आर्थिक वर्ष संपण्यास काही दिवस शिल्लक राहिले असून जिल्हा परिषदेच्या बहुतांश विभागाचे अद्यापही नियोजन झालेले नाही. जर वेळेवर नियोजन झाले नाही तर मोठ्या प्रमाणावर निधी परत जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment