अमृता खानविलकर सध्या ट्रेंडिंग अभिनेत्री आहे. अमृताचा चंद्रमुखी चित्रपट २९ एप्रिलला येत आहे. चंद्रमुखचं प्रमोशन खूपच जोरदार सुरु आहे.

आज चक्क Spice Jet च्या विमानावरच चंद्रमुखी झळकल्याचं पाहायला मिळालं. एका विमानावर चंद्रमुखीच पोस्टर चिटकवून चित्रपटाचं प्रमोशन करण्यात आलं.

अमृता खानविलकर, आदिनाथ कोठारे यांची मुख्य भूमिका असणारा चंद्रमुखी चित्रपट विश्वास पाटील यांच्या चंद्रमुखी कांदंबरीवर बनण्यात आलाय.

एक राजकारणी तमाशात डान्स करणाऱ्या तिच्या प्रेमात पडतो अन त्यांच्या या लफड्यामुळं सगळंच राजकारण बदलतं असं काहीस यात दाखवण्यात आलाय.

चंद्रमुखी चित्रपट गाजणार असं एकंदर वातावरण दिसत आहे. यातील अनेक गाणी सोशल मीडियावर चांगलीच ट्रेंडिंगला आहेत.

स्वतः अमृता खानविलकर मागील काही दिवसांपासून चंद्रमुखीच्या प्रमोशन मध्ये व्यस्त आहे. हिंदी चित्रपटाला लाजवेल अशा अंदाजात चंद्रमुखीच प्रमोशन सुरु आहे.

अमृताने स्वतःही अनेक हटके रिल्स केली आहेत. चंद्रमुखी गाण्यावरील रिल्स अक्षरशः धुमाकूळ घालत आहेत.