सिताफळ नियमित खाण्याचा तुमच्या आरोग्यावर चांगला परिणाम होतो.
सिताफळ हे नैसर्गिक अॅंटिऑक्सिडंट आहे. यातील व्हिटॅमिन सीमुळे तुमच्या शरीरातील दाह कमी होतो आणि रोगप्रतिकारशक्ती सुधारते.
आजकाल कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. यावर उपाय म्हणून रोजच्या आहारात सिताफळाचा समावेश जरूर करा.
सततचा ताणतणाव, चिंता, चिडचिड, थकवा, मानसिक तणाव दूर करण्यासाठी सिताफळाचा नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो.
दात आणि हिरड्यांच्या समस्या दूर करण्यासाठी तुम्ही सिताफळाचा वापर करू शकता.
सिताफळातील काही पोषकघटकांमुळे तुमचे दृष्टीदोषदेखील कमी होऊ शकतात.