मला हिंदीत भाषण देता येत नाही म्हणून मी इंग्रजीत बोलेन…. काही वेळ इंग्रजीत बोलल्यानंतर रतन टाटा स्वतःला रोखू शकले नाहीत अन त्यांनी मोडक्या तोडक्या हिंदीत बोलायला सुरवात केली. काल आसाम येथे पंतप्रधान मोदी यांच्यासमवेत एका कार्यक्रमात रतन टाटा उपस्थित होते.

नुकतेच आसाम येथे काही कॅन्सर रुग्णालयांचे उदघाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये रतन टाटा यांनीही आपले योगदान दिले आहे.

माझ्या आयुष्याची शेवटची वर्ष मी आरोग्य आरोग्य क्षेत्रासाठी काम करणार असल्याचं या कार्यक्रमात रतन टाटा यांनी सांगितलं.  आपल्या थरथरत्या आवाजात टाटा यांनी काहीवेळ भाषण केलं.

रत्न टाटा हे नेहमीच त्यांच्या साध्या राहणीमानामुळे चर्चेत असतात. तसेच गरिबांसाठी ते सतत काहीतरी करताना दिसून येतात.

रतन टाटा यांच्या देशाच्या जडणघडणीत खूप मोठे योगदान राहिले आहे.

आजवर रतन टाटा यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.

एक यशस्वी उद्योजक तसेच आपल्या कंपनीत काम करणाऱ्यांची योग्य काळजी घेणारा व्यावसायिक अशी टाटा यांची ओळख आहे. त्यामुळेच रतन टाटा यांचा खूप मोठा चाहता वर्ग आहे.