पुणे – नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे प्रकल्पाच्या मार्गात बदल ; कसा असेल नवीन मार्ग ?

pune -nashik semi high-speed
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे ते नाशिक या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडण्यासाठी पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला असून याच प्रकल्पाबाबत आता मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी हा प्रकल्प संगमनेर मार्गे प्रस्तावित होता मात्र आता या प्रकल्पामध्ये बदल केला जाणार आहे. संगमनेर ऐवजी हा प्रकल्प आता दुसऱ्या मार्गाने जाणार आहे.

म्हणून बदलणार मार्ग

मिळालेल्या माहितीनुसार या रेल्वे मार्गामध्ये जुन्नर तालुक्यातील जायंट मीटर वेब रडिओ टेलिस्को प्रकल्प येत असल्यामुळे या प्रकल्पाच्या रूट मध्ये बदल करण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला असून आता संगमनेर ऐवजी हा मार्ग शिर्डी मधून जाणार आहे. केंद्रीय मंत्रालयाने जी एम आर टी स्थलांतर होणार नसून पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे प्रकल्पाचा मार्ग बदलला जाईल असे स्पष्ट केला आहे.

कसा असेल नवीन मार्ग ?

याबाबत माहिती देताना केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की आम्ही आपणास सांगू इच्छितो की गेला अनेक महिन्यांपासून हा प्रकल्प रखडलेला आहे. हा प्रकल्प केंद्राच्या मंजुरीविना गेले काही दिवस अडकून होता. जीएमआरटी प्रकल्प भारतासाठीच नाही तर भारता व्यतिरिक्त इतर 23 देशांसाठी महत्त्वाचे वैज्ञानिक केंद्र आहे. अशा परिस्थितीत या केंद्राचे स्थलांतर करणे म्हणजे भारतातील सर्वात शक्तिशाली केंद्राची क्षमता कमी करण्यासारखं होईल. यामुळे जीएमआरटी प्रकल्पाला धक्का न लावता पुणे नाशिक नवीन रेल्वे मार्गाचा आराखडा तयार करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. त्यानुसार हा रेल्वे मार्ग पुणे- अहिल्यानगर- शिर्डी – नाशिक असा असेल

रेल्वे मार्गाचे अंतर वाढणार

नव्या प्रस्तावित मार्गानुसार हा रेल्वे मार्ग शिर्डी वरून जाणार असल्यामुळे रेल्वे मार्गाचे अंतर वाढण्याची शक्यता आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुणे ते नाशिक असा प्रवास वेगवान व्हायला मदत होणार आहे. सध्याच्या घडीला पुणे ते नाशिक असा थेट रेल्वे मार्ग नसल्यामुळे हा प्रकल्प पूर्णत्वास आल्यास नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे.