‘दाना’ चक्रीवादळाचा अलर्ट ! तेजस-राजधानी सहित रद्द केल्या 12 रेल्वे गाड्या ; तपासा लिस्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

देशभरात हवामान खात्याकडून ‘दाना’ चक्रीवादळाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे उडीसा आणि पश्चिम बंगाल मध्ये येणाऱ्या संभाव्य चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर तेजस राजधानी एक्सप्रेस सह 12 ट्रेन रद्द करण्यात आल्याची माहिती आहे. याबाबतची माहिती पूर्व मध्य रेल्वे सरस्वतीचंद्र यांनी एका हिंदी माध्यमाला दिली आहे.

पश्चिम बंगाल आणि उडीसा या भागात येणाऱ्या संभावित दाना चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे खात्याकडून 12 ट्रेन रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तुम्ही देखील दिवाळीच्या निमित्ताने गावी जाणार असाल आणि यासाठी तुम्ही ट्रेनचे बुकिंग केलं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण 12 ट्रेन रद्द केल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. आगामी दिवाळी सणाच्या निमित्ताने अनेकांनी गावी जाण्यासाठी रेल्वेचे १ महिना आधीच बुकिंग केलेले असते. मात्र चक्रीवादळामुळे ट्रेन रद्द केल्याने प्रवाशांची गैरसोय होऊ शकते. याशिवाय दिवाळी निमित्त रेल्वे खात्याकडून विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहेत याच्यवरही परिणाम होणार असून या काही गाड्या देखील रद्द करण्यात आल्या आहेत.

याबाबत माहिती देताना सरस्वतीचंद्र यांनी सांगितले की उडीसा आणि पश्चिम बंगाल येथे येणाऱ्या संभाव्य दाना चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर 12 ट्रेन रद्द करण्यात आले आहेत. चला जाणून घेऊया रद्द करण्यात आलेल्या ट्रेनच्या माहितीबद्दल.

‘या’ गाड्या रद्द

  • दिनांक 24 ऑक्टोबर 2024 रोजी सुटणारी ट्रेन क्रमांक 03230 पटना पुरी स्पेशल रद्द करण्यात आली आहे.
  • याबरोबर 24 तारखेलाच सुटणारी ट्रेन क्रमांक 22644 पटना एरणाकुलम एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे.
  • गाडी क्रमांक 02832 भुवनेश्वर धनबाद स्पेशल रद्द करण्यात आली आहे.
  • तर गाडी क्रमांक 0 2 831 धनबाद भुवनेश्वर स्पेशल ही गाडी सुद्धा रद्द करण्यात आली आहे.
  • याबरोबरच 24 तारखेला सुटणारी गाडी क्रमांक 18419 ही पुरी जयनगर एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे.
  • तर दिनांक 26 ऑक्टोबर 2024 ला सुटणारी गाडी क्रमांक 18420 जयनगर पुरी एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे.
  • आज दिनांक 23 ऑक्टोबर रोजी सुटणारी गाडी क्रमांक 22824 नवी दिल्ली भुनेश्वर तेजस राजधानी एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे
  • तर दिनांक 25 ऑक्टोबर रोजी सुटणारे गाडी क्रमांक 22823 भुवनेश्वर नवी दिल्ली तेजस राजधानी एक्सप्रेस गाडी रद्द करण्यात आली आहे.
  • दिनांक 24 ऑक्टोबर 2024 ला सुटणारी गाडी क्रमांक 15227 एस एम बी बी बेंगलुरु मुजफ्फरपुर एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे
  • तर दिनांक 23 ऑक्टोबर म्हणजे आजच सुटणारी गाडी क्रमांक 12 80 2 नवी दिल्ली पुरी पुरुषोत्तम एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे.
  • तर दिनांक 24 ऑक्टोबर 2024 रोजी सुटणारी गाडी क्रमांक 12816 आनंद विहार पुरी नंदन कानन एक्सप्रेस रद्द करण्यात आलेली आहे
  • तर दिनांक 25 ऑक्टोबर 2024 रोजी सुटणारी गाडी क्रमांक 12875 पुरी आनंद विहार नीलांचल एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे.