महाराष्ट्रात रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे! भारतीय रेल्वेच्या “अमृत भारत स्टेशन योजना” अंतर्गत राज्यातील 132 महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांचा भव्य कायापालट होणार आहे. या योजनेचा उद्देश म्हणजे स्थानकांचे संपूर्ण आधुनिकीकरण करून प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देणे. या ऐतिहासिक प्रकल्पाची घोषणा केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेत केली.मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री वैष्णव यांचे विशेष आभार मानले, आणि महाराष्ट्रातील रेल्वे पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्याच्या या पावलाचं स्वागत केलं.
कोणती स्थानकं होणार स्मार्ट?
या योजनेत समाविष्ट झालेली काही प्रमुख आणि गर्दीची स्थानकं म्हणजे:
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (1813 कोटी)
- नागपूर जंक्शन (589 कोटी)
- पुणे, नाशिक रोड, औरंगाबाद, कोल्हापूर, सोलापूर, परभणी, सातारा, सांगली आणि अंधेरी, दादर, टिळक टर्मिनस यांसारखी अनेक मोठी केंद्रं.
त्याचबरोबर ग्रामीण आणि उपनगरी भागातील इगतपुरी, दौंड, चांदा फोर्ट, मालाड, डोंबिवली, चिंचवड, आकुर्डी, परळी वैजनाथ* यांसारख्या स्थानकांनाही नवसंजीवनी मिळणार आहे.
प्रवाशांसाठी काय बदल होणार?
या प्रकल्पामुळे प्रवाशांसाठी पुढील आधुनिक सेवा उपलब्ध होणार:
- वातानुकूलित वेटिंग लाऊंज
- फूड कोर्ट्स, आधुनिक स्वच्छतागृहे
- लिफ्ट्स व एस्कलेटर्स
- डिजिटल डिस्प्ले, स्मार्ट टिकिटिंग
- स्थानकांचे सौंदर्यीकरण आणि स्थानिक शहरांशी सुसंगत दळणवळण
स्थानकांवर होणाऱ्या गुंतवणुकीचा अंदाज
अजनी स्टेशन 297.8 कोटी रुपये
नागपूर जं. 589 कोटी रुपये
नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी जं. 17.4 कोटी कोटी रुपये
जालना 189 कोटी रुपये
छत्रपती संभाजीनगर 241 कोटी रुपये
रोटेगाव 12 कोटी रुपये
अहिल्यानगर 31 कोटी रुपये
भायखळा 35.5 कोटी रुपये
चिंचपोकळी 52 कोटी रुपये
चर्नी रोड 23 कोटी रुपये
छत्रपती शिवाजी महाराज टमिनल 1813 कोटी रुपये
ग्रँट रोड 27 कोटी रुपये
लोअर परेल 30 कोटी रुपये
मरिन लाइन्स 27.7 कोटी रुपये
सॅण्डहर्स्ट रोड 16.4 कोटी रुपये
मुर्तिजापूर स्टेशन 13 कोटी रुपये
बडनेरा 36.3 कोटी रुपये
बारामती 11.4 कोटी रुपये
दौंड 44 कोटी रुपये
केडगाव 12.5 कोटी रुपये
परळी वैजनाथ 25.7 कोटी रुपये
भंडारा रोड 7.7 कोटी रुपये
गोंदिया 40 कोटी रुपये
तुमसर रोड 11 कोटी रुपये
टिटवाळा 25 कोटी रुपये
शेगाव 29 कोटी रुपये
बल्लारशाह 31.4 कोटी रुपये
चंद्रपूर 25.5 कोटी रुपये
चांदा फोर्ट 19.3 कोटी रुपये
धुळे 9.5 कोटी रुपये
लासलगाव 10.5 कोटी रुपये
मनमाड 45 कोटी रुपये
नगरसोल 20.3 कोटी रुपये
नांदगाव 20 कोटी रुपये
आमगाव 7.8 कोटी रुपये
वडसा 20.5 कोटी रुपये
हातकंणगले 6 कोटी रुपये
हिमायतनगर 43 कोटी रुपये
हिंगोली डेक्कन 21.5 कोटी रुपये
किनवट 23 कोटी रुपये
चाळीसगाव 35 कोटी रुपये
अंमळनेर 29 कोटी रुपये
धरणगाव 26 कोटी रुपये
पाचोरा जं. 28 कोटी रुपये
दिवा 45 कोटी रुपये
मुंब्रा 15 कोटी रुपये
शहाड 8.4 कोटी रुपये
कोल्हापूर – छत्रपती शाहू महाराज टर्मिनस 43 कोटी रुपये
लातूर 19 कोटी रुपये
जेऊर 20 कोटी रुपये
कुर्डूवाडी जं 20 कोटी रुपये
फलटण 1 कोटी रुपये
वाठर 8 कोटी रुपये
आकुर्डी 34 कोटी रुपये
चिंचवड 20.4 कोटी रुपये
देहू रोड स्टेशन 8.05 कोटी रुपये
तळेगाव स्टेशन 40.34 कोटी रुपये
मालाड स्टेशन 12.32 कोटी रुपये
कुर्ला जं. स्टेशन 28.81 कोटी रुपये
कांजुरमार्ग स्टेशन 27 कोटी रुपये
विद्याविहार स्टेशन 32.8 कोटी रुपये
विक्रोळी स्टेशन 19 कोटी रुपये
जोगेश्वरी स्टेशन 119 कोटी रुपये
माटुंगा स्टेशन 17.3 कोटी रुपये
परळ स्टेशन 19.4 कोटी रुपये
प्रभादेवी 21 कोटी रुपये
वडाळा स्टेशन 23 कोटी रुपये
भोकर स्टेशन 11.3 कोटी रुपये
धर्माबाद स्टेशन 30 कोटी रुपये
मुखेड जं.स्टेशन 23 कोटी रुपये
उमरी स्टेशन 8 कोटी रुपये
देवळाली स्टेशन 10.5 कोटी रुपये
इगतपुरी स्टेशन 12.5 कोटी रुपये
धाराशिव स्टेशन 22 कोटी रुपये
गंगाखेड स्टेशन 16 कोटी रुपये
मनवथ रोड स्टेशन 12 कोटी रुपये
परभणी जं. स्टेशन 26 कोटी रुपये
परतूर स्टेशन 23 कोटी रुपये रुपये
पूर्णा जं. स्टेशन 24 कोटी रुपये
सेलू स्टेशन 23.2 कोटी रुपये
हडपसर स्टेशन 25 कोटी रुपये
गोधनी स्टेशन 29 कोटी रुपये
काटोल स्टेशन 23.3 कोटी रुपये
कामठी स्टेशन 7.7 कोटी रुपये
नरखेड जं. स्टेशन 37.6 कोटी रुपये
कराड स्टेशन 12.5 कोटी रुपये
सांगली स्टेशन 24.2 कोटी रुपये
लोणंद जं.स्टेशन 10.5 कोटी रुपये
सातारा स्टेशन 34.3 कोटी रुपये
बेलापूर स्टेशन 32 कोटी रुपये
कोपरगाव स्टेशन 30 कोटी रुपये
सेवाग्राम स्टेशन 18 कोटी रुपये
धामणगाव स्टेशन 18 कोटी रुपये
हिंगणघाट स्टेशन 22 कोटी रुपये
पुलगाव स्टेशन 16.5 कोटी रुपये
उरूली स्टेशन 13 कोटी रुपये
वाशिम स्टेशन 20.3 कोटी रुपये
मलकापूर स्टेशन 19 कोटी रुपये
नांदुरा स्टेशन 10.6 कोटी रुपये
रावेर स्टेशन 9.2 कोटी रुपये
सावदा स्टेशन 8.5 कोटी रुपये
दुधनी स्टेशन 22 कोटी रुपये
पंढरपूर स्टेशन 40 कोटी रुपये
सोलापूर स्टेशन 56 कोटी रुपये
नंदूरबार स्टेशन 15 कोटी रुपये
पालघर स्टेशन 17.5 कोटी रुपये