शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी , केंद्र सरकारकडून तब्बल 15 लाखांची मदत

fpo
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेती हे उदरनिर्वाहाचे साधन असून, देशातील करोडो लोक हा व्यवसाय करतात. त्याचबरोबर अनेक जोडधंद्याचे सहाय्य घेतात. शेतकऱ्यांच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून वेळोवेळी विविध योजना राबवल्या जातात. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी भारत सरकारने पीएम किसान एफपीओ योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना व्यवसाय उभारणीसाठी तब्बल 15 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. तर या योजनेचा अर्ज कसा करावा हे आज आपण पाहणार आहोत.

एफपीओ योजना

प्रधानमंत्री शेतकरी FPO ( Farmer Producer Organization ) हि योजना शेतकऱ्यांना बळकट करण्यासाठी आणि शेती व्यवसायातून जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी केलेली महत्वाची योजना आहे. यामध्ये शेतकरी उत्पादक संघटना स्थापन करून त्यांना आर्थिक मदत दिली जाते. या योजनेअंतर्गत कमीत कमी 11 शेतकऱ्यांची संघटना तयार करून , त्याची नोंदणी केलेली असावी लागते . या संघटनेच्या माध्यमातून शेतीशी संबंधित व्यावसायिक उपक्रम, उत्पादन प्रक्रिया, पॅकिंग आणि मार्केटिंगचे काम केले जाते. या योजनेतून एकत्रित काम केल्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन अधिक फायदेशीर ठरू शकते. तसेच या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी चांगले बाजारपेठ उपलब्ध होईल.

अर्ज कसा करावा

या योजनेचा लाभ घेण्यासाठी एकट्या शेतकऱ्याला अर्ज करता येणार नाही. अर्ज करण्यासाठी शेतकरी उत्पादक संघटना (FPO) स्थापन करावी लागते, ज्यात किमान 11 शेतकरी असणे आवश्यक आहे. या संघटनेची नोंदणी करून सरकारकडे अर्ज करावा लागेल. यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज करण्यासाठी तुम्ही https://www.enam.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी . वेबसाइटवर नोंदणी केल्यानंतर लागणारी सर्व माहिती भरून अर्ज सबमिट करावा लागेल. यासाठी तुम्हाला FPO चे व्यवस्थापक, MD किंवा CEO यांचे नाव, पत्ता, ई-मेल आयडी आणि संपर्क क्रमांक द्यावा लागेल.

शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचवण्यास मदत

शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होऊन , कुटुंबाला आर्थिक स्थिरता मिळेल . तसेच शेतीसाठी चालना मिळेल . शेतकऱ्यांचे उत्पादन विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध होईल. त्यामुळे त्यांना नफा मिळेल. त्याचाच परिमाण शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावेल आणि जास्त कालावधीसाठी फायदा होईल. शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी अशा अनेक योजना केंद्र सरकार राबवत असून, पीएम किसान एफपीओ योजना शेतकऱ्यांना नव्या दिशेने नेण्यास महत्त्वाची ठरणार आहे.