हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची संख्या वाढत असून, गेल्या दोन महिन्यांत 161 शेतकऱ्यांनी आपला जीव घेतला आहे. यामध्ये सर्वाधिक बीड जिल्ह्यात 44 आत्महत्या झाल्या आहेत. कमी झालेल्या पिकांचे भाव, वाढता कर्जाचा डोंगर आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी गंभीर संकटात सापडले आहेत. त्यामुळे हे टोकाचे पाऊल शेतकरी उचलत आहेत. तर चला या मराठवाड्यातील भीषण परिस्थितीबदल अधिक माहिती जाणून घेऊयात.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या –
एका अहवालानुसार, जानेवारी महिन्यात 87 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, तर फेब्रुवारी महिन्यात 74 शेतकऱ्यांनी जीव दिला. शेतकऱ्यांना मदतीसाठी 30 कुटुंबीय पात्र ठरले आहेत, पण फक्त सात शेतकऱ्यांच्या वारसांना मदत मिळाली आहे. त्याच वेळी, 23 कुटुंबांना मदतीची प्रतीक्षा आहे, तर 126 प्रस्ताव चौकशीसाठी प्रलंबित आहेत.
मालाला भाव न मिळण्याची समस्या –
मराठवाड्यात सिंचनाची कमी आणि कोरडवाहू क्षेत्रांची वाढ यामुळे शेतकरी पुन्हा निसर्गावरच अवलंबून आहेत. गेल्या काही वर्षांत शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीचा तडाखा आणि मालाला भाव न मिळण्याची समस्या भेडसावत आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक गणितावर या समस्यांचा खोल परिणाम होत आहे, ज्यामुळे त्यांच्या मनोबलावरही मोठा परिणाम झाला आहे.
तात्काळ उपाययोजना करणे गरजेचे –
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या वाढत्या घटनांमुळे समाजात चिंता व्यक्त केली जात आहे आणि यावर तात्काळ उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे सांगितले जात आहे.