Satara News : जर तुम्ही सुट्टीनिमित्त, पर्यटनानिमित्त साताऱ्यातून प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण सातारा जिल्ह्यातील रस्त्यांवर प्रवास करताना तुमच्या गाडीचे स्पीड निर्धारित स्पीड पेक्षा जास्त असेल तर तुमच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते. कारण आता रस्ते सुरक्षा नियमांचे पालन आणि प्रवासादरम्यानची सुरक्षितता वाढवण्यासाठी सातारा जिह्यातील (Satara News) प्रादेशिक परिवहन कार्यालयात 4 स्पीडगन इंटरसेप्टर वाहने दाखल झाली असून या वाहनांचा वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कडक वॉच असणार आहे.
अपघात टाळता येणार
राज्याच्या परिवहन विभागाकडून ही वाहने सातारा (Satara News) जिल्ह्याला मिळाली असून ही वाहने महामार्ग, राज्यमार्ग व अन्य ठिकाणी तैनात करण्यात येणार आहेत. याबाबत माहिती देताना प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी सांगितले की, वाहनांच्या वाढत्या वेगामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी तसेच रस्ता सुरक्षिततेबाबत जनजागृती होण्यासाठी परिवहन विभागाची अंमलबजावणी यंत्रणा अधिक परिपूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून बदल होत चालला आहे. इंटरसेप्टर वाहनामुळे मोटार वाहन कायद्याची व नियमांची तसेच रस्ता सुरक्षाविषयक बाबींची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करता येणार आहे
स्पीडगन इंटरसेप्टर वाहनांची वैशिष्ट्ये (Satara News)
- या वाहनांत अत्याधुनिक यंत्रणा बसवण्यात आली आहे.
- वेगमर्यादा निश्चित करून देण्यात आलेल्या रस्त्यावर वेगमर्यादा ओलांडून जाणारे वाहन सहजपणे टिपता येणार आहे.
- गाडीला असलेल्या काळ्या फिल्मच्या काचेची जाडी तपासता येणार आहे.
- ड्रिंक अँड ड्राइव्ह या नियमाची ब्रेथ अनालायझर मशीन याच वाहनात बसवण्यात आली आहे.
- एकाचवेळी अनेक वाहनांच्या नोंदी होणार आहेत. हायटेक स्पीड गनचा वापर करून जास्तीत जास्त वाहने एकाच कॅमेऱयात टिपून त्यांच्या वेगाच्या नोंदी ठेवतील.
- वेगाने गाडी चालवणाऱ्यांसाठी ई-चलन , दंड ऑनलाईन भरला जाईल ज्याचा (Satara News) संदेश थेट मोबाईलवर मिळणार आहे.