हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतामध्ये पेट्रोलच्या दरात सतत वाढ होत असल्याने चांगले मायलेज देणारी मोटरसायकल वापरणे ही गरज बनली आहे. अनेक वेळा मोटरसायकल स्वारांना त्यांच्या वाहनाचा अपेक्षेप्रमाणे मायलेज न मिळाल्यास निराशा होतात , विशेषतः जे दररोज 25 ते 30 किलोमीटर प्रवास करतात. अशा परिस्थितीत गाडीचे मायलेज सुधारण्यासाठी काही उपाय करणे गरजेचे असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला काही जबरदस्त उपाय सांगणार आहोत , ज्यामुळे तुमच्या गाडीचे मायलेज चांगले होईल.
मायलेज वाढवण्यासाठी उपयुक्त उपाय –
जर तुमच्या बाईकचे मायलेज कमी असेल तर कार्बुरेटरची सेटिंग तपासा. तसेच आवश्यक असल्यास कार्बुरेटरला मॅन्युअली किंवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने रीट्यून करा. यामुळे इंजिनची कार्यक्षमता सुधारते आणि मायलेजही वाढते. तसेच जर सिग्नलवर 20 सेकंदांपेक्षा जास्त वेळ थांबावे लागले तर इंजिन बंद करा. सतत चालू ठेवलेले इंजिन इंधनाचा अपव्यय करते. याचा सर्वात जास्त फायदा शहरांमध्ये राहणाऱ्यांसाठी आहे , कारण तिथे वारंवार थांबावे लागते . यासोबतच बाईकच्या टायरमध्ये कंपनीने दिलेल्या निर्देशांनुसार हवेचा दाब ठेवावा. जर लांब प्रवासाला जात असाल तर पेट्रोल पंपावर टायरचा प्रेशर नक्की तपासा. तसेच
बाईक नियमितपणे स्वच्छ ठेवा आणि चालत्या भागांवर लुब्रिकेशन करा. यामुळे भागांची कार्यक्षमता टिकून राहते आणि बाईकचा परफॉर्मन्स सुधारतो, ज्याचा थेट परिणाम मायलेजवर होतो. बाईकवर अनावश्यक मॉडिफिकेशन केल्यास मायलेज कमी होऊ शकते.
कोणत्या गोष्टी टाळाव्यात –
जास्त वेगाने बाईक चालवण्याचे टाळा, कारण उच्च वेगाने चालवल्यास इंधनाचा अधिक वापर होऊ शकतो . त्याचप्रमाणे, अचानक ब्रेक लावण्यापासून टाळा , कारण यामुळे इंजिनवर अतिरिक्त ताण येतो आणि इंधनाची कार्यक्षमता कमी होते. गियर योग्य प्रकारे वापरणेही खूप महत्त्वाचे आहे, कारण योग्य गियरमध्ये बाईक चालवल्यास इंधनाचा वापर कमी होतो. तसेच बाईकची नियमितपणे सर्व्हिसिंग करून घ्या, कारण चांगली स्थिती राखलेली बाईक अधिक कार्यक्षमतेने चालते आणि इंधनाची बचत करते. हे सर्व उपाय जर तुम्ही अवलंबले, तर तुमच्या बाईकचे मायलेज नक्कीच चांगला होऊ शकते आणि इंधन खर्च कमी होऊ शकतो.