हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Mobile Phones Under 10000 – आज प्रत्येक ग्राहकांना कमी किंमतीत चांगला अन दमदार फोन हवा असतो. पण पैशा अभावी ते फोन खरेदी करू शकत नाहीत. सध्याच्या काळात 5G नेटवर्क भारतात वेगाने रोलआउट होत आहे. त्यामुळे अनेक लोक आता 5G स्मार्टफोनच घेत आहेत. सुरुवातीला हे स्मार्टफोन मिड-रेंज मध्ये होते, पण आता 10000 रुपयांपेक्षा कमी किमतीत देखील 5G स्मार्टफोन मिळत आहेत. तर चला या कमी किमतीत भेटणाऱ्या स्मार्टफोन बदल अधिक माहिती जाणून घेऊयात .
Samsung Galaxy F06 5G (Mobile Phones Under 10000) –
सॅमसंगने नुकताच Galaxy F06 5G लाँच केला आहे. 6.7 इंच डिस्प्ले असलेला हा स्मार्टफोन एचडी+ रिझोल्यूशन ऑफर करतो. फोनच्या डिस्प्लेमध्ये वॉटर ड्रॉप नॉच आहे. 5G कनेक्टिव्हिटीसाठी यात मीडियाटेक डायमेंसिटी 6300 प्रोसेसर मिळतो. या स्मार्टफोनमध्ये 4GB RAM आणि 128GB इंटरनल स्टोरेज आहे. 5000 mAh बॅटरी आणि २५W फास्ट चार्जिंग सपोर्ट करतो. 50 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. हा फोन एंड्रॉइड 15 वर रन करतो.
Xiaomi Redmi 14C 5G –
रेडमी 14C 5G, 10000 रुपयांपेक्षा कमी किमतीत 5G कनेक्टिव्हिटीसह उपलब्ध आहे. यामध्ये स्नॅपड्रॅगन 4 Gen2 प्रोसेसर आहे आणि 4 GB RAM, 64GB इंटरनल स्टोरेज आहे. 5160mAh बॅटरी आणि 18W फास्ट चार्जिंग आहे. 6.88 इंच एचडी+ डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट आणि वॉटर ड्रॉप नॉच आहे. 50 MP मुख्य कॅमेरा आणि 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे. हा स्मार्टफोन एंड्रॉइड 14 वर रन करतो.
Lava Yuva 2 5G –
लावा युवा 2 5G भारतीय ब्रॅंड आवडणाऱ्यांसाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. यामध्ये 6.67 इंच एचडी+ डिस्प्ले आहे, ज्यात 90Hz रिफ्रेश रेट आहे. 4GB RAM आणि 128GB इंटरनल स्टोरेज आहे. Unisoc T760 प्रोसेसरसह काम करणारा हा स्मार्टफोन 50 मेगापिक्सल मुख्य कॅमेरा आणि 2 मेगापिक्सल दुसरा कॅमेरा ऑफर करतो. 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. हा स्मार्टफोन एंड्रॉइड 14 वर चालतो.
Infinix 5G –
सॅमसंग आणि शाओमी व्यतिरिक्त, इनफिनिक्स देखील 10000 रुपयांपेक्षा कमी किमतीत 5G स्मार्टफोन ऑफर करत आहे. यामध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 6300 प्रोसेसर आहे, 4GB RAM आणि 128GB इंटरनल स्टोरेज आहे. 5000mAh बॅटरी आणि 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. 6.7 इंच एचडी+ डिस्प्ले आणि 120Hz रिफ्रेश रेट आहे. 48 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. एसडी कार्डद्वारे 1TB पर्यंत स्टोरेज वाढवता येईल. हा फोन एंड्रॉइड 14 ओएसवर काम करतो.
10,000 रुपये पेक्षा कमी किमतीत उपलब्ध –
या स्मार्टफोनमध्ये 5G कनेक्टिव्हिटी, मोठे डिस्प्ले, चांगले कॅमेरा, आणि पावरफुल प्रोसेसर्स आहेत. सर्व स्मार्टफोन 10,000 (Mobile Phones Under 10000)रुपये पेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहेत.