हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एखाद्याला जर विचारले कोंबडा किती वजनाचा असतो , तर प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या अंदाजानुसार त्याचे वजन एक-दोन किलो सांगेल. मात्र तुम्ही कधी सहा किलोचा कोंबडा पाहिला आहे का , असा प्रश्न विचारल्यास त्याचे उत्तर बरेच लोक नाही असे देतील . पण काही दिवसांपासून सोशल मीडियावर एका राजा कोंबड्याने धुमाकूळ घातला आहे. त्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून , तो स्थानिक बाजारात आणि प्रदर्शनांमध्ये मोठी हवा करताना दिसत आहे . तर चला या तब्बल सहा किलो वजनाच्या कोंबड्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात .
साध्या कोंबड्यांपेक्षा फार हटके –
राजा कोंबड्याने केवळ बारामतीत लोकांचेच नाही तर संपूर्ण जिल्यांचे लक्ष केंद्रित करून घेतले आहे. हा कोंबडा साध्या कोंबड्यांपेक्षा फार हटके आहे. तसेच याचे पोषणदेखील एका रॉयल लोकांसाठी असल्याचे दिसत आहे. त्याचे मालक या कोंबड्याची खूप चांगली काळजी घेतात असे सांगण्यात आले आहे. राजा कोंबड्याला रोजच्या खुराकात दूध दिलं जातं, ज्यामुळे त्याची तब्येत चांगली राखली आहे . दूध पिणारा कोंबडा असे ऐकतात अनेकजण आश्चर्य व्यक्त केलं आहे
खुराकासोबत दूध पिणारा कोंबडा –
राजा कोंबडा हा वनराज क्रॉस जातीचा असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच हा कोंबडा फक्त बारा महिन्यांचा आहे. हा राजा कोंबड्याला खुराकासोबत दूध प्यायला आवडत असल्याचं त्याच्या मालकाने सांगितले आहे. या कोंबड्याला रोज सकाळी मका भरडा, कोंबडी खाद्य, भुसा दिला जातो. तसेच दुपारी भुसा, तांदूळ, गहू, बाजरी हे धान्य दिले जाते. याचसोबत संध्याकाळच्या खुराकात दूध, भुसा, कोंबडी खाद्य दिले जाते. त्यामुळे त्याची उंची, वजन एवढे झाले आहे . तसेच त्याची चमकदार पिसं पाहून अनेकजण विचारात पडले आहेत.