हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मेटा कंपनीच्या व्हॉट्सअॅपने भारतात फेक न्यूज आणि अभद्र भाषा वापरणाऱ्यांच्या विरुद्ध कठोर पाऊल उचलले आहे. ऑगस्ट महिन्यात 84.58 लाख खात्यांना बॅन केल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये 1661000 खात्यांवर कोणतीही तक्रार न करता थेट कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई माहिती तंत्रज्ञान कायदा 2021 अंतर्गत करण्यात आली असून , त्यात उल्लंघन करणारे आणि बेकायदेशीर गोष्टीत सहभागी असलेल्या खात्यांचा समावेश आहे.
मशीन लर्निंग आणि डाटा ॲनालिटिक्सचा वापर
व्हॉट्सअॅपने 84.58 लाख अकाउंट्सवर ऑगस्ट महिन्यात बंदी घातली असून , या निर्णयाचा मुख्य उद्देश प्लॅटफॉर्मवरील सुरक्षितता कायम ठेवणे आणि दुरुपयोग टाळणे हा आहे. व्हॉट्सअॅपने फेक अकाउंट्स ओळखण्यासाठी मशीन लर्निंग आणि डाटा ॲनालिटिक्सचा वापर केला आहे, ज्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अकाउंट्सवर कारवाई केली जाईल . याशिवाय 16.61 लाख अकाउंट्स कोणत्याही तक्रारीशिवाय बंद करण्यात आले आहेत.
IT नियमांतर्गत कारवाई
2021 साली केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने लागू केलेल्या माहिती तंत्रज्ञान नियमांतर्गत 50 लाखांपेक्षा जास्त यूजर्स असलेल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना मासिक अहवाल सादर करणे बंधनकारक असल्याचे सांगण्यात आले आहे . यामध्ये वापरकर्त्यांच्या तक्रारी आणि कारवाई यांची माहिती दिली जाते. व्हॉट्सअॅपने स्पष्ट केले आहे की, बेकायदेशीर गोष्टींना कधीही प्रोत्साहन दिले जात नाही, तसेच संशयास्पद कृती आढळल्यास त्यावर तत्काळ कठोर कारवाई केली जाते. दरवर्षी हजारो खात्यांवर अशी कारवाई केली जाते आणि त्यांना कायमस्वरूपी बंद केले जाते.