8th Pay Commission : 8वा वेतन आयोग 2026 पासून लागू होणार, पण ‘या’ तारखेनंतर निवृत्त होणाऱ्यांना लाभ मिळणार का?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

8th Pay Commission : केंद्र सरकारच्या कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी पुढे आली आहे. 2026 पासून लागू होणाऱ्या आठव्या वेतन आयोगाबाबत एक नवा खुलासा झाला असून, हा खुलासा थेट 1 जानेवारी 2026 रोजी किंवा त्यानंतर निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

आठवा वेतन आयोग म्हणजे काय?

भारत सरकार दर काही वर्षांनी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्त्यांचे पुनरावलोकन करण्यासाठी ‘वेतन आयोग’ (Pay Commission) स्थापन करते. याअंतर्गत कर्मचाऱ्यांच्या मौल्यवाढ, जीवनमान, महागाई, सेवा अटी, निवृत्ती वेतन, भत्ते इत्यादींचा विचार करून वेतनवाढीची शिफारस केली जाते.पहिला वेतन आयोग 1946 साली स्थापन झाला होता.सातवा वेतन आयोग 2014 मध्ये स्थापन झाला आणि त्याची अंमलबजावणी 2016 पासून झाली. त्यानंतर आता आठवा वेतन आयोग (8th Pay Commission) स्थापन करण्यास केंद्र सरकारने 2024 च्या सुरुवातीला मंजुरी दिली आहे.

2026 पासून आठव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी

केंद्र सरकारने जाहीर केल्याप्रमाणे, 8 वा वेतन आयोग 1 जानेवारी 2026 पासून लागू होणार आहे. सध्या आयोगाच्या संदर्भ अटी (Terms of Reference – TOR) निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच आयोगासाठी सुमारे 35 पदे प्रतिनियुक्तीच्या माध्यमातून भरण्यात येणार असून, अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अद्याप आयोगाचे अध्यक्ष किंवा सदस्यांची अधिकृत घोषणा झालेली नाही, पण काम सुरू झाले आहे, हे निश्चित.

मग निवृत्त होणाऱ्यांना काय मिळेल? (8th Pay Commission)

हा प्रश्न सध्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चिला जात आहे “जर एखादा कर्मचारी 1 जानेवारी 2026 रोजी किंवा त्यानंतर निवृत्त झाला, आणि त्यावेळी 8 वा वेतन आयोग लागू झाला नसेल, तर त्याला वेतन आयोगाचा लाभ मिळेल का?” उत्तर आहे होय! सरकारच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे की, अशा सर्व कर्मचाऱ्यांना थकबाकीच्या (arrears) स्वरूपात लाभ मिळणार आहे. म्हणजे, आयोगाची अंमलबजावणी उशिरा झाली तरी लागू होणाऱ्या कालावधीत (retrospective effect) त्या कर्मचाऱ्यांचा वेतनहिसाब सुधारला जाईल.यापूर्वी सातवा वेतन आयोग लागू होतानाही सुमारे एक वर्षाचा विलंब झाला होता, पण त्यावेळी सर्व कर्मचाऱ्यांना आणि निवृत्तांना थकबाकी मिळाली होती.

महत्त्वाचे मुद्दे

आठवा वेतन आयोग 2026 पासून लागू होणार
TOR आणि आयोगाच्या सदस्यांबाबत प्रक्रिया सुरू
1 जानेवारी 2026 रोजी किंवा नंतर निवृत्त होणाऱ्यांना वेतन आयोगाचा थकबाकी स्वरूपात लाभ मिळणार
सातव्या आयोगासारखाच पॅटर्न आठव्या वेतन आयोगातही अपेक्षित
अंमलबजावणी वेळेवर झाली नाही, तरी आर्थिक नुकसान होणार नाही

जर तुम्ही 1 जानेवारी 2026 रोजी किंवा त्यानंतर निवृत्त होणार असाल, तर चिंता करण्याची गरज नाही. आठवा वेतन आयोग लागू झाला नसला तरी, तो लागू झाल्यावर मागील दिवसांपासून सुधारित वेतनाचा लाभ मिळेल, याची खात्री सरकारने दिली आहे.