इतिहासात पहिल्यांदाच मशीनच्या मदतीनं जन्मला बाळ ! AI चं चमत्कारीक यश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

विज्ञानाच्या प्रगतीनं आता अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होऊ लागल्या आहेत. जे काम आजवर फक्त अनुभवी डॉक्टरांच्या हातून व्हायचं, तेच आता मशीन आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) करत असल्याचं पहिल्यांदाच घडलं आहे. जगात प्रथमच AI आणि पूर्णपणे ऑटोमेटेड IVF प्रणालीच्या सहाय्यानं एका बाळाचा यशस्वी जन्म झाला आहे.

AI च्या सहाय्यानं जन्मलेलं बाळ

हे ऐतिहासिक पाऊल केवळ वैद्यकीय जगतातील क्रांती नाही, तर संतानप्राप्तीच्या प्रक्रियेला एक नवी दिशा देणारा प्रयोग आहे. ऑटोमेटेड IVF (In Vitro Fertilization) तंत्रज्ञान आणि AI च्या मदतीनं, डॉक्टरशिवाय संपूर्ण प्रक्रिया पार पाडली गेली आणि यशस्वी गर्भधारणा झाली.

हा चमत्कार कसा घडला?

सामान्यतः ICSI (Intracytoplasmic Sperm Injection) प्रक्रियेमध्ये स्पर्म अंड्यात इंजेक्ट करण्याचं काम तज्ज्ञ डॉक्टर करतात. पण या प्रक्रियेत मानवी चूक किंवा अस्थिर परिणामांची शक्यता असते. मात्र आता वैज्ञानिकांनी न्यूयॉर्क आणि मेक्सिकोतील तज्ज्ञांच्या मदतीनं एक पूर्णतः ऑटोमेटेड सिस्टम तयार केली आहे.

या प्रणालीने 23 स्टेप्स AI आणि डिजिटल कंट्रोलद्वारे पार पाडल्या. यात योग्य स्पर्म निवडणं, लेझरच्या सहाय्यानं त्याला निष्क्रिय करणं आणि अंड्यात इंजेक्ट करणं ही सर्व प्रक्रिया यंत्रांनी केवळ 9 मिनिटं 56 सेकंदात पूर्ण केली.

फायदे काय?

या प्रकल्पामागील प्रमुख भ्रूणतज्ज्ञ डॉ. जैक्स कोहेन यांनी सांगितलं की, ही प्रणाली IVF जगतातील ‘गेमचेंजर’ ठरू शकते. यामुळे प्रक्रिया अधिक शुद्ध आणि अचूक होईल, मानवी चुकांची शक्यता कमी होईल आणि अंड्याची गुणवत्ताही अधिक चांगली राहील. या प्रक्रियेमध्ये 5 पैकी 4 अंड्यांचं यशस्वी फलन झालं आणि त्यातून एक आरोग्यदायी भ्रूण तयार करून फ्रीझ करून त्याचा वापर केला गेला. परिणामी एका निरोगी बाळाचा जन्म झाला.

भविष्यातील संधी

डॉक्टरांचं म्हणणं आहे की या प्रणालीचं भविष्यात अधिक परिष्कृत आणि वेगवान रूप विकसित केलं जाईल. यामुळे IVF चा खर्च कमी होईल, यशाची टक्केवारी वाढेल आणि जगभरातील लाखो निःसंतान जोडप्यांना पालकत्वाचा नवा आशेचा किरण मिळेल.